सध्याच्या काळात बराचसा नवीन तरुण वर्ग शेतीकडे वळालेला आढळून येतो. तेंव्हा त्यांना अनेक प्रश्न पडतात. आम्ही त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आमच्या छोट्या छोट्या लेखांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
प्रसारमाध्यमे, शासन आणि इतर सर्वजण शेतीसाठी नवनवीन सिंचन पद्धती जसे की सूक्ष्म सिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन वापरण्यावर भर देत आहेत. समजा आपण ठिबक सिंचन पद्धती जी की सर्वात जास्त फायदा देणारी सिंचन पद्धती आहे ती निवडली तर आपल्याला आधी शेतात पाईपलाईन करून घ्यावी लागेल. पाईपलाईन टाकणे हि एक खर्चिक बाब आहे. अशात आपल्याला पाईपलाईनच्या सुरक्षेविषयी विचार करणे गरजेचे आहे.
आपण जेंव्हा शेतात पाईपलाईन करतो तेंव्हा पाईप हे चढ-उतारावरून, वळणावरून, जमिनीच्या आतून जातात अशा वेळी तेथे पाण्याचे प्रेशर वाढून पाईप फुटण्याची शक्यता वाढते.
जेंव्हा आपण ठिबक सिंचन वापरीत असतो तेंव्हा संपूर्ण सिस्टीम हि एक बंद प्रणाली ( Closed System ) असते अशावेळेस अनावश्यक हवा आत कोंडली जाते जी बाहेर काढण्यासाठी काही तरी यंत्रणा असणे आवश्यक आहे. नाहीतर पाईपलाईन फुटण्याची शक्यता वाढते.
तसेच, अनेकवेळा आपल्याला दिसते की विहिरीजवळ पाईप चिमटून जातो. हे असे होते कारण मोटर बंद केल्यानंतर पाणी परत मागे जात असतांना हवा कोंडली जाते आणि ती हवा बाहेर निघण्यास जागा नसते म्हणून तिथे पोकळी / व्हॅकयूम निर्माण होतो आणि पाईप चिमटून फाटतो.
ह्या सर्व घटना टाळण्यासाठी आणि कोंडल्यागेलेली अनावश्यक हवा बाहेर काढण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आवश्यक त्या ठिकाणी एअर रिलीज व्हाल्व लावणे.
आता आपल्याला समजले असेल की एअर रिलीज व्हाल्व लावणे का गरजेचे आहे ते. अशीच महत्वपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू त्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमच्या यु-ट्यूब चॅनेल ‘ Heera Agro Industries ’ ला सबस्क्राईब करा.
गिरीश खडके
Leave a reply