शेतामध्ये वाढत्या रासायनिक वापरला आळा घालण्यासाठी तसेच सामान्य शेतकऱ्याचे लक्ष जैविक शेतीकडे वळवण्यासाठी सरकार कडून अनेक पाऊल उचलले जात आहे. तसेच मोठ्या प्रमाणात योजना चालवल्या जात आहे. याचा परिणाम म्हणजे शेतकरी हळूहळू जैविक शेतीकडे वळू लागले आहे. जैविक शेतीमध्ये उत्पन्न कमी निघते परंतु रसायन विरहीत अन्न खाण्यास मिळते. पूर्वोत्तर भारतामध्ये वसलेले सिक्कीम पूर्णपणे जैविक राज्य घोषित केले गेले आहे आणि जैविक शेतीसाठी पूर्ण जगभर प्रसिध्द होत आहे. राज्यातील जनतेला रसायनविरहीत अन्न दिले जात असल्याने सिक्कीमला ग्लोबल फ्युचर पॉलीसी अवार्ड ने सन्मानित केले आहे. सिक्कीम भारतातले असे राज्य आहे की ज्या ठिकाणी जैविक शेती केली जाते. या प्रदेशाला २०१८ साली संयुक्त राष्ट्रांच्या फूड & अँग्रीकल्चर ऑर्गनायझेशनचा “ फ्युचर पॉलीसी गोल्ड पुरस्कार ” दिला गेला. या पुरस्काराला हरितक्षेत्रातील ऑस्कर मानले जाते.
Leave a reply