इवलीशी मधमाशी….आरोग्याची, पैशाची पेटी ! मधमाशी या कीटकाला सामाजिक कीटक म्हटले जाते. सपुष्प वनस्पतींना मधमाशीचा होणारा स्पर्श हा परीसस्पर्शापेक्षा कमी नसतो; फलधारणेसाठी अत्यंत आवश्यक असतो. मधमाशा स्वतः करिता अन्न मिळवत असताना निसर्गाची व शेतकर्यांची ही प्रत्यक्षपणे मधाच्या रूपाने आणि अप्रत्यक्षपणे पिकांच्या फुलोऱ्यातील परागसिंचना करता मदत करतात.
कोरोना महामारीमुळे आरोग्याबाबत जागरूकता वाढत असतांना व आयुर्वेदाचा प्रसार वाढत असल्याने मधाची मागणी येणाऱ्या पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.मधापसून तयार उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करणे फायदेशीर ठरेल. अधिक उत्पन्ना करीता योग्य नियोजन महत्वाचे आहे तसेच रोजगार निर्मीतीला वाव. ग्रामीण भागातील बेरोजगारीसाठी हा एक चांगला पर्याय आहे .
तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ४०० ते ५०० मिलीग्रॅम मध गोळा करण्यासाठी हजारो मधमाशांना २० लाख फुलांवर जावे लागते.अंदाजे ९०००० कि.मी. अंतर त्यांना तेवढ्या मधासाठी फिरावे लागते.एक मधमाश्यांची वसाहत एका वर्षात अंदाजे ४५ किलो मध गोळा करते.
मधुमक्षिका पालनाचे फायदे – (Benefits of beekeeping)
- शुद्ध मधाचे उत्पादन , शुद्ध मेणाचे उत्पादन.
- औषध आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये मध आणि मेणाचा उपयोग ,
- शेती , फळबाग आणि भाजीपाला पुरक यांसारख्या इतर कोणत्याच उद्योगाशी स्पर्धा करत नाही.
- श्राजान्न ( Royal Jelly ) चे उत्पादन.
- मधमाश्यांच्या विषाचे उत्पादन .
- परागीभवनाद्वारे पिकांच्या आणि फुलांच्या उत्पादनात भरीय वाढ व निसर्गाचे संतुलन व संवर्धन होते.
मधुमक्षिका पालनासाठी पूर्तता – (Essentials of beekeeping)
- जात – मधुमक्षिका पालनात मधमाशा ची योग्य जातीची निवड खूप म्हत्वाची आहे.
- वनस्पतीं– उपयुक्त पराग, मकरंद देणाऱ्या व फुलोऱ्याचे सातत्य असणार्या वनस्पती.
- प्रशिक्षण – मधुमक्षिका पालनासाठी आवश्यक तंत्र.
- बाजारपेठे– मध आणि मेण विक्रीसाठी लागणारी बाजारपेठ
- तंत्रज्ञान- मधपेटय़ा आणि मधयंत्र हाताळण्याची योग्य माहिती .
मधमाशा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी विशिष्ठ प्रकारचे नृत्य करतात.
मधमाशाच्या प्रजाती (Bee species) :
भारतामध्ये मधमाशाच्या चार महत्वाच्या प्रजाती आहेत .
१. दगडी माशी ( Apis Dorsata ) या मधमाशा उत्तम प्रकारे मध गोळा करतात आणि त्यांच्या प्रत्येक वसाहतीमागे सरासरी मध उत्पादन अंदाजे ५०-८० किलो असते .
२.लहान माशी ( Apis floria) या मधमाशा कमी मध गोळा करतात आणि त्यांच्या वसाहतीमागे अंदाजे २०० – ९ ०० ग्रॅम मध मिळते
३. भारतीय माशी ( Apis Serrana Indica ) या मधमाशांमुळे होणारे मध उत्पादन वर वर्षी प्रतिवसाहत ६-८किलो असते .
४. युरोपियन माशी (Apis melifera) या मधमाशांद्वारे वर वसाहती मागे सरासरी मध उत्पादन २५-४० किलो असते.
मधमाश्यांचे प्रकार
सफल मधुमक्षिका पालनासाठी आपल्याला मधमाशी वसाहती आणि त्यांचे जीवन चक्र याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. प्रत्येक मधमाशी कॉलनी मधमाश्याच्या तीन प्रकारांनी बनलेली असते; त्यांच्या कामांनुसार मधमाशी मध्ये जाती पडतात.
- एक राणी मधमाशी : सहसा वसाहतीतील एकमेव एक सुपीक मादी.
- महिला कामगार मधमाशी : ज्या मोठ्या संख्येने उपस्थित असतात, साधारणत: विशिष्ट वसाहतीत 30,000 पेक्षा जास्त असतात.
- नर ड्रोन्स : जो प्रजनन उद्देशाने विशिष्ट वसाहतीत शेकडो संख्येने उपस्थित आहे.
मधमाश्यांचे तीन प्रकार १) कामकरी / महिला कामगार माशी २ ) राणीमाशी ३ ) नरमाशी / नर ड्रोन्स
मधमाशापालन उद्योगासाठी आवश्यक साधनसामुग्री (equipment for beekeeping )
१. मधूपेटी (Honey comb) : आधुनिक मधमाशापालनात योग्य मधुपेटीची अत्यंत आवश्यकता असते .
२. मधुनिष्कासक यंत्र (Honey extractor) : मधकोठातील मधाने भरलेल्या चौकटीतून मध काढण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो .
३. पटाशी ( हाईप टूल ) : ही एक इंग्रजी ‘ L ‘ आकाराची पोलादी पट्टी असते . हिचा उपयोग वसाहत तपासणीचे वेळी होतो .
४. धुमक : ह्या यंत्राचा उपयोग धूर करण्यासाठी होतो . धुरामुळे मधमाशा संभ्रमात पडतात व वसाहतीची देखभाल करणे सोपे होते .
५.बुरखा : मधमाशाच्या वसाहती तपासतांना तोंडावरील नाजूक भाग मधमाशांच्या दंशापासून वाचविण्यासाठी काळ्या मच्छरदाणीच्या कापडांचा बुरखा वापरला जातो .
६. चाकू : मधपोळावरील मेणाचा पापुद्रा काढण्यासाठी मेणपत्रे चिकटविण्यासाठी सुरीचा उपयोग होतो ,
७. पाकपात्र : मधमाशांना साखरेचा पाक देण्याकरिता अॅल्युमिनीयमच्या पसरट वाट्याचा उपयोग होतो .
८. मेणपत्रे : मधमाशांची वाढ जलद व्हावी व पोकळ्या बांधण्यात त्यांचे श्रम वाया जाऊ नयेत म्हणून मधमाशांच्या मेणापासून बनविलेले मेणपत्रे चौकटीत बसवितात.असे मेणपत्रे बसविल्याने वसाहतीची वाढ जलद होते व मधाचे उत्पादनही वाढू शकते .
९ . राणीपिंजरा : मधमाशांची नैसर्गिक वसाहती पकडतेवेळी राणीमाशीला राणी पिंजराचा उपयोग होतो .
धूमक (smoker)
मधुनिष्कासक यंत्र (Honey extractor)
मधाच्या पोळ्यांची स्थापना (Establishment of honey bees)
- पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत मध उत्पादन केंद्र उभारावे .
- फळबागांच्या जवळ मकरंद , परागकण आणि भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी उभारणी करावी .
- पोळ्याचे तापमान आवश्यक तितके राहण्यासाठी सूर्यप्रकाशापासून मधमाशांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे .
- मधमाशा पेटीत ठेवतांना चारही पायाखाली पाण्याने भरलेली पाटी ( Ant-wells) ठेवावी , जेणेकरून पेटीत मुंग्या जाणार नाही
- शक्यतो वसाहतीचे तोंड पूर्व दिशेला असावे .
- वसाहतींना पाळीव जनावर , अन्य प्राणी , गर्दीचे रस्ते , इलेक्ट्रीक पोल पासून दूर ठेवावे .
मधपेट्या ठेवण्याची वेळ
- फळबागेतील व फळभाज्या पिकांतील फुलोरा ५ ते १० टक्के झाल्यानंतर शेतामध्ये पेट्या ठेवाव्यात.
- एक हेक्टर पिकासाठी अंदाजे ३ भारतीय माशांच्या किंवा २ युरोपियन माशांच्या पेट्या ठेवाव्यात.
मधमाशाचे खाद्य (Bee food)
मधमाशा मकरंद व पराग यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असतात . फुलातील मकरंद गोळा करून मधमाशा मध तयार करतात . म्हणूनच यशस्वी मधमाशी पालनासाठी हा फुलोरा जवळ – जवळ वर्षभर उपलब्ध असणे आवश्यक आहे .
मधमाशी पालनास उपयुक्त वनस्पतींची लागवड
- शेवगा, रिठा, निलगिरी,सावर या वनस्पती लावल्यास मधमाश्यांना वर्षभर अन्नाचा पुरवठा होतो.
- शेतात जवळपास मका नेहमी फुलात राहील अशा प्रकारे मका पेरल्यास मधमाशी पालनास फायदा होतो
वसाहतीचे व्यवस्थापन (Colonial management)
- मधाच्या पोळ्यांची तपासणी शक्यतो सकाळच्या तासांमध्ये मधाच्या हंगामामध्ये आठवड्यातून किमान एकदा करावी
- पोळ्यांची स्वच्छता पुढील क्रमाने करावी , छप्पर सुपर / सुपरस , बुड चेंबरर्स आणि फ्लोअर बोर्ड .
- सुदृढ राणी माशी , अन्यांची वाढ , मध आणि परागकणांची साठवणूक , राणी चौकटीची उपस्थिती माशांच्या संख्या आणि नर मधमाश्यांच्या पाढे पाहण्यासाठी वसाहतीवर नियमितपणे देखरेख ठेवा .
- मधमाश्यांच्या खालील पैकी कोणत्याही शत्रूव्दारे त्रास होत असल्यास त्यांचा शोध घ्या , मेण कीड ( Platybolium ) प्रौर कीडे गोळा करून नष्ट करा
- जेष्ठ माशांना काढा आणि उपलब्ध सुदृढ नव्या माशांना ब्रूड चेंबरमध्ये नीट बसवा
- तुडतुडे- नाईट्यांचा अपाय जाणवल्यास पोळ्यांची चौकट आणि तळाचा बोर्ड ताज्या बनवलेल्या पोटॅशिअम परमॅग्नेट मध्ये बुडविलेल्या कापसाच्या बोळयांनी स्वच्छ करा .
- राणीमाशीला ब्रुड चेम्बरमध्येच ठेवण्यासाठी ब्रुड आणि सुपर पेम्बर यांच्या दरम्यान राणीला वेगळी करणारी शीट्स ठेवा .
- वसाहतीची तपासणी आठवड्यातून एकदा करा आणि मधाने भरलेल्या फ्रेम्स सुपरच्या बाजून काढून घ्याव्यात . तीन -चतुर्थांश भाग मधाने किंवा परागकणांनी भरलेल्या आणि एक चतुर्थाश बंदीस्त अळ्यांनी भरलेल्या फ्रेम्स चेंबरच्या बाहेर काढून घ्याव्यात आणि त्यांच्या जागी रिकामी पोळी किंवा फ्रेम्स आधारासहित ठेवण्यात याव्यात .
मधाची काढणी ( Honey extraction )
१.पोळ्याच्या ज्या भागातून मध काढायचा आहे त्या भागातील मधमाशांना धुराने दूर करावे आणि पोळी काळजीपूर्वक कापून घ्यावीत .
२.मधाची काढणी शक्यतो दोन मुख्य फुलोऱ्याच्या मोसमांच्या दरम्यान आणि त्यांच्या लगेच नंतर , अनुक्रमें ऑक्टोबर / नोव्हेंबर आणि फेब्रुवारी-जूनमध्ये काढणे शक्य होते.
३.मधाचे पिकलेले पोळे रंगाने हलके असते आणि मधाने भरलेले असते.
किटकनाशकांपासून मधमाशांचे संरक्षण (Protection of bees from pesticides)
१.पेटीतील हवा योग्य प्रकारे खेळती राहील याकडे लक्ष द्यावे .
२.फारच गरज वाटल्यास ( आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास ) किटकनाशकांचा योग्य त्या ठिकाणीच वापर करावा .
३.फवारणी शक्यतोवर सूर्यास्ता नंतर करावी .
४.मधमाशांना हानी होणार नाही अश्या किटकनाशकांचा ( एन.एस.के.व्ही . ५ टके ) याचा उपयोग करावा
५.पेटी जवळच्या परिसरात फवारणी करू नये .
६.शक्य नसल्यास पेट्या फवारणीच्या ठिकाणापासून कमीत कमी २ ते ३ कि.मी. अंतरावर ठेवाव्यात .
मधमाशांमुळे लाभ होणारी पिके (Crops benefiting from bees)
१ ) नगदी पिके : कापूस
२ ) तेलबिया : मोहरी , तीळ , कराळ , सूर्यफूल .
३ ) फळभाज्या : वांगी , भेंडी , मिरची , काकडी , भोपळा , टोमॅटो , दुधी भोपळा , कारले इ.
४ ) फळ पिके : सफरचंद , लिंबू , संत्री , मोसंबी , पेरू , लिची इ . तूर , मूग , उडीद , मटकी इ.
मधाचे फायदे (profit of honey)
- उर्जा देणारे एक उत्तम नैसर्गिक अन्नघटक .
- एक चांगले अँटिबायोटिक आणि अँटीसेप्टिक.
- स्नायुंना बळकटी देणारे .
- खोकला . कफ . दमा या विकारांवर उपयुक्त .
- यकृत व पोटाच्या आजारावर उपयुक्त .
- वजन कमी करण्याची फायदेशीर .
- जलद थकवा घालवून कार्यशक्ती वाढते .
- विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनामध्ये उपयुक्त .
Leave a reply