अशा परिस्थितीत स्फुरदासाठी ‘हाड-मासांचे खत‘ (बोनमील)
अत्यंत उपयुक्त, प्रभावी व परिणामकारक
संत्रा/मोसंबी बागायतदारां पासुन कोरडवाहू शेतकऱ्यांपर्यंत स्फुरद युक्त (दाणेदार) खतांचा अत्याधिक वापर प्रत्येकच पीकांसाठी शेतीमध्ये केला जातो. डी.ए.पी./सुपर फॉस्फेट या स्फुरद युक्त खतांचा अत्याधिक वापर करून सुद्धा स्फुरदाची (फॉस्फरस) कमतरता फळ झाडांवर व पीकांवर दिसून येतेच. असे होण्यामागचे नेमके कारण काय ?
नजीकच्या बर्याच संशोधनात हे निष्पन्न झालेले आहे कि *रासायनिक स्फुरद (फॉस्फेट) युक्त खतांचा शेतीतील वापर निरर्थक व बिनकामाचा ठरत आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे… प्रत्येकच शेत जमीनीचा ७.५ च्या समोर गेलेला सामू (PH) आणि जमीनीतील सेंद्रिय म्हणजेच कुजणाऱ्या खतांची कमतरता.
असे होण्यामागचे नेमके कारण काय ?
*जमीनीचा ‘सामू (PH) जेंव्हा ६-७ च्या दरम्यान असतो’ त्यावेळेसच स्फुरद युक्त रासायनिक खताद्वारे देण्यात आलेले फॉस्फरस पीकांना मीळू शकते.
* आपल्या भागातील कोणत्याच जमीनीचा सामू (PH) आता ७.५-८ च्या खालचा राहिलेला नाही.
* तेंव्हा आपण पोत्यांनी शेतात ओतत असलेल्या “सुपर फॉस्फेट” चे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण (stabilization) होवून माती कणांना तो तसाच (फॉस्फरस) चिकटून बसतो आणि
*पीकांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. आपण केलेला त्यावरील खर्च निरर्थक ठरतो.
अशा परिस्थितीत काही तज्ञ महाभाग कृत्रिम रित्या तयार केलेले ,भाडोत्री ‘PSB’ जीवाणू. जमिनीत सोडण्याचा अफलातून सल्ला देतात. असे लॅबमधले PSB जीवाणू कितीही जमिनीत सोडले तरी ते सेंद्रिय म्हणजेच कुजणाऱ्या पदार्थांवरच जगू शकतात.हे आपणास व्यापारी उद्देश असल्या कारणाने हेतू- पुरस्सरच सांगण्यात येत नाही.
म्हणुनच आजमितीस स्फुरद (फॉस्फेट) युक्त रासायनिक खते बगीच्यात किंवा शेतीत टाकुन सुद्धा संत्रा/मोसंबी व कोरडवाहू पीकांची क्वालिटी, चमक, बट्टिदार फळे, चोपडी साल, गोडवा, आकर्षक रंग व टिकाऊ क्षमता अश्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या बाबतीत आपण कोसो दुर जात आहोत.
त्याबरोबरच कडधान्य (हरबरा, तुर) पीकांच्या शेतीतील मर रोग, मुळकूज व तुर उभाळण्या सारख्या रोगराईस बळी पडत आहे.
ह्यावर उपाय काय ?
बोनमील मुळे प्रतीकारक क्षमतेची निर्मिती होते. करिता, भरपूर प्रमाणात म्हणजेच *५% नत्र, १२% स्फुरद (फॉस्फरस) व २४% कॅल्शियम पुरवठा करणाऱ्या “हाड-मासाच्या” (बोनमील) सेंद्रिय म्हणजेच कुजणाऱ्या खताचा अत्याधिक वापर करणे महत्वाचे आहे.
कारण, अशी नैसर्गिक पर्यायांवर आधारीत खते वापरली कि लॅब मध्ये तयार केलेली भाडोत्री PSB, रायझोबीयम सारखी जिवाणू जमिनीत सोडण्याची गरजच पडणार नाही. पर्यायाने शेतीवरील खर्च सुद्धा कमी होईल.
Leave a reply