सध्याच्या महागाईच्या काळात शेती करणे खूप कठीण होत आहे. शेतीसाठी लागणारी उपकरणे महाग होत आहे. या महागाईच्या काळात एक आशेचा किरण म्हणजे हिरा ड्रीप होय. आपल्याला वाजवी दरात ड्रिप उपलब्ध होत आहे. जर तुम्ही हिरा ड्रीप ची निवड करणार असाल तर जाणून घ्या कि कमी किंमतीत ड्रिप कशी मिळेल ?
हिरा ड्रिप च्या ह्या पॅकेज मध्ये एका एकरावर ठिबक करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व सामान मिळेल . ह्या पॅकेजला तयार करते वेळेस आम्ही दोन ओळींमधील अंतर 4 फुट आणि दोन रोपांमधील अंतर 1.25 फुट ग्राह्य धरण्यात आलेले आहे. ह्यामध्ये पॅकेज तयार करते वेळेस पीव्हीसी पाईप 4 Kg प्रेशर सहन करू करणारे, आय एस आय ग्रेडचे हिरा रिजिड पाईप सुद्धा देण्याचे ठरविलेले होते परंतु पीव्हीसी पाईप ट्रान्सपोर्ट ने दूरवर पाठविणे शक्य नसल्याने आणि त्यांच्या सतत वाढत चाललेल्या किंमतीमुळे त्यांची किंमत वगळून जी पॅकेज ची किंमत होतेय त्या किंमतीत हे पॅकेज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल.
पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी आवश्यक एक बॉल व्हॉल्व मिळेल. एकरासाठी गणितानुसार आवश्यक 3000 मीटर 16 mm ठिबक नळी तीन बंडलांच्या स्वरुपात देण्यात येईल. तसेच ठिबक जोडणीस आवश्यक ग्रोमेट, टेक अप, जॉईनर,ड्रिल आणि एन्ड कॅप ह्या एक्सेसरीज देखील योग्य संख्येत देण्यात येतील. सबमेन पाईप चे शेवटी लावण्यासाठी आवश्यक फ्लश व्हॉल्व सुद्धा ह्यात समाविष्ट आहे . सिंचनाचे पानी फिल्टर करण्यासाठी उत्कृष्ट क्वालिटीचा लोखंडी फिल्टर तुमच्या पाईपलाईन च्या साईझ नुसार मिळणार आहे. त्याची जाळी स्टीलनेस स्टील ची असते. १२० मेशची जाळी आहे. हे १०५०० रुपयाचे पॅकेज कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे याची माहिती घेऊ.
हे सर्व पिकांसाठी चालेल. याच्यामधले ड्रिपर एका तासात चार लिटर पाणी देणारे आहेत.त्याऐवजी एका तासाला दोन लिटर पाणी देणारे ड्रिपरयुक्त ठिबक घ्यावयाचे असल्यास तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल. 1.25 फुटा ऐवजी तुम्हाला 1.5 फुट, 2.0 फुट अंत असणारी ठिबक नळी पाहिजे असल्यास ती सुद्धा उपलब्ध होईल. फक्त एक फुट पाहिजे असल्यास जास्तीचा खर्च द्यावा लागेल कारण, त्यात ड्रिपर्स ची संख्या वाढते. या ड्रिपरचे वैशिष्ट म्हणजे या ड्रिपरला पाणी बाहेर पडण्यासाठी 2 छिद्रे आणि 4 रस्ते आहेत. त्यामुळे हे ड्रिपर लवकर चोकअप होत नाहीट. हे ड्रिपर हायड्रो – टर्बो डिझाईन चे बनलेले असल्याने इतर ड्रिपरच्या तुलनेत जास्त टिकते. यासोबत या ड्रिपरवर शेवाळ प्रतिबंधक कोटिंग दिलेली आहे. त्यामुळे कमी प्रमाणात शेवाळ तयार होईल.त्यामुळे ड्रीप कमी चोकअप होईल.ज्या पिकांचे अंतर जास्त आहे जसे कि फळपिके लिंबू,आंबा, मोसंबी या झाडांसाठी हि ड्रिप चालणार नाही.
5 comments on “१०५०० रुपयात एक एकर ड्रीप मिळवा……”
Rahul
How to purchase this product
Required 1 set
Gavit Narayan Sarya
मुझे drip chahiye
Tal Navapur Dist -Nandurbar
425418
Shiv patel
Mujhe 2acer ki drip chahiye sir
Pravin Cholake
1 aker inline paheje
Pravin Cholake
1 aker inline paheje ok
Ok