ह्या महामारीच्या काळात प्रतिबंध हाच उपाय हिच एक उक्ती सर्वांना लागू होते. संसर्गापासून वाचण्यासाठी कुठलीच लस आणखी प्रभावी ठरली नाहीय आणि संसर्ग वाढत जातोय. परंतु आपण सर्वजण आपापली कामे तर करणारच मग सुरक्षित कसे राहणार ? ह्यासाठीच आम्ही हिरा ॲग्रो इंडस्ट्रीज ,जळगाव ( महाराष्ट्र ) आपणासाठी घेऊन आलोय संपूर्ण सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण कक्षात लावण्यासाठी ‘ हिरा सिंगल फॉगर’ ज्याच्या द्वारे गर्दीच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही पूर्णतः रहाल सुरक्षित !
कशी होईल तुमची सुरक्षा ?
मोठ्या प्रमाणावर जिथे माणसांची गर्दी होणार आहे अशा ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी एक माणूस एका बाजूने जाऊन दुसऱ्या बाजूने निघू शकेल एवढ्या आकाराचा कक्ष तुम्हाला उभारावा लागेल आणि त्या कक्षात नळी किंवा पाईप वर हे फॉगर्स लावून त्यातून निर्जंतुकीकरण द्रव्य फवारायचे आहे. ह्यामुळे तुमच्या संपूर्ण बाह्य शरीराला संसर्गापासून संरक्षण मिळेल.
हिरा सिंगल फॉगर ची प्रमुख वैशिष्ट्ये –
१) पी.व्ही.सी / GI पाईप वर सहज फिट करता येईल अशी रचना.
२) १/२’’ बाहेरील आट्यात उपलब्ध.
३) विशेष लिकेज प्रतिबंधक उपकरणासहित उपलब्ध.
४) मानवी केसापेक्षाही सूक्ष्म जाडीचे पाण्याचे तुषार – ५० ते ६० मायक्रॉन ( ४ कि.ग्रॅ / से.मी2 पाण्याचा दबाव असल्यास )
५) उच्च पाणी वितरण एकसारखेपणा आणि कव्हरेज. ( ७.५ लिटर/ तास )
६) आवश्यक पाण्याचा दबाव – २.५ ते ४ कि.ग्रॅ / से.मी2
लिकेज प्रतिबंधक उपकरण –
हिरव्या रंगाचे विशेष लिकेज प्रतिबंधक उपकरणासहित फॉगर येते. हे उपकरण उलट्या स्थापनेदरम्यान फॉगरमधून थेंब येणे प्रतिबंधित करते आणि आस्थापनेत पाणी भरलेले ठेवते जेणेकरून फॉगर्स एकाच वेळीस चालू अथवा बंद करता येतात.
हिरा ॲग्रो इंडस्ट्रीज ,जळगाव ( महाराष्ट्र ) हि सिंचन आणि कृषी उपकरणे क्षेत्रात नावाजलेली कंपनी असून आमची उत्पादने गुणवत्तापूर्ण सेवा देण्यात प्रसिद्ध आहेत. आपणही आपल्या परिसरात संसर्गापासून सुरक्षितता मिळविण्यासाठी हिरा सिंगल फॉगर वापरून निर्जंतुकीकरण कक्ष उभारू शकता. आजच संपर्क करा आमच्या संकेतस्थळाला दिलेल्या लिंक वर www.heeraagro.com
Leave a reply