हिरा ब्रश कटर एक बहुपयोगी कृषी संयंत्र असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून वापर होत आहे. परंतु असे निदर्शनास आले कि व्यवस्थित न हाताळल्यामुळे आणि निर्देश न पाळल्यामुळे सदर संयंत्राचे इंजिन आणि कार्ब्यूरेटर खराब होऊन संयंत्र बंद पडत आहे. काय आहे ह्याच्या मागचे कारण ? काय उपाय करावा लागेल म्हणजे असे होणार नाही ?
ब्रश कटर च्या इंजिन आणि कार्ब्यूरेटर मध्ये खराबी का होते ?
हिरा ब्रश कटर चे इंजिन हे 2-स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे. ह्यासाठी इंधनासोबत ( पेट्रोल ) ऑईल मिश्रित करणे आवश्यक आहे. परंतु योग्य प्रकरचे ऑईल आणि त्याचे योग्य प्रमाण न वापरल्याने सदर संयंत्राच्या इंजिन आणि कार्ब्यूरेटर मध्ये बिघाड येण्याचे प्रमाण वाढते. परिणामी संयंत्र काम करणे बंद करते.
किती ऑईल टाकावे आणि कसे ?
हिरा ब्रश कटरचा पहिल्यांदा वापर करतांना पेट्रोल सोबत ४० मि.ली. ऑईल योग्य रीतीने मिसळून टाकावे. नंतर ह्या ऑईलचे प्रमाण थोडे कमी म्हणजे ३५ मि.ली. पर्यंत करावे. हे लक्षात ठेवावे कि ऑईल कमी टाकल्यास नुकसान होणार आहे तसेच ते जास्त टाकले तरीही समस्या येणार आहेच. म्हणून ऑईल योग्य प्रमाणातच टाकावे. कधीही प्रथम पेट्रोल व ऑईल व्यवस्थित एका पात्रात मिसळून मगच इंधन टाकीत टाकावे. जास्त ऑईल टाकल्यास ते इतरत्र पसरते, लिक होते, फिल्टरवर येते, स्पार्क प्लग वर येते आणि मग इंजिन चालू होण्यास त्रास होतो.
कोणते ऑईल वापरावे ?
हिरा ब्रश कटरसाठी इंधनासोबत योग्य ब्रॅण्डेड कंपनीचे 2 T ऑईल मिश्रित करून टाकावे. शेतकरी लोकल दुकानातून ऑईलची पुडी घेऊन ते ऑईल टाकतो. असे ऑईल निकृष्ट दर्जाचे, हिरव्या रंगाचे आणि जास्त घट्ट असते. परिणामी ते फिल्टर आणि कार्ब्यूरेटर च्या पडद्यावर साचून त्यांना निकामी करते आणि संयंत्र बंद पडते.
त्यासाठी ब्रश कटरमध्ये ब्रॅण्डेड कंपनीचेच जसे कि Castrol ऑईल वापरावे म्हणजे त्याच्या इंजिनचे आयुष्य वाढून ते दीर्घकाळ सेवा देईल.
-
हिरा हायब्रीड ब्रश कटरProduct on sale₹27,500.00
-
हिरा चैन कटर
-
हिरा ब्रश कटरProduct on sale₹17,500.00
Leave a reply