दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पाण्याच्या टंचाईमुळे व अनियमित पावसामुळे शेती व्यवसाय हतबल झाला आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा सुनियोजित वापर करण्यासाठी सिंचनाच्या विविध पद्धती वापरण्याशिवाय पर्याय नाही. सामान्य शेतकरी किंवा कमी क्षेत्र धारणा असणारे शेतकरी ह्यांना आधुनिक सिंचनाचे पर्याय किंमती अधिक असल्यामुळे परवडत नाही. अशा परिस्थितीत हिरा अग्रो इंडस्ट्रीज, जळगाव शेतकरी बांधवांसाठी खासकरून घेऊन आलीय सिंचनाचा स्वस्त आणि मस्त पर्याय ज्याच्या मदतीने तुम्ही शेतात पावसासारखे पाणी फवारू शकता ‘हिरा रेनपाईप’
ह्या लेखातून आपण रेनपाईप इरिगेशन विषयी सविस्तर माहिती घेऊ –
Contents
काय आहे रेनपाईप?
उच्चतम दर्जाच्या आणि टिकाऊ प्लास्टिक पासून बनविलेला आणि लेझर तंत्रज्ञान वापरून झिगझॅग आकारात छिद्रे पाडलेला सिंचनासाठी वापरला जाणारा घडी करता येईल असा पाईप म्हणजे रेनपाईप.
हा पाईप पावसासारखे पाणी शेतात आणि पिकांवर फवारतो म्हणून ह्याला रेनपाईप म्हणतात.
रेनपाईप इरिगेशनची वैशिष्ट्ये :
# रेनपाईप एक प्रकारचे तुषार सिंचन आहे.
# रेनपाईप सहजपणे हाताळता येतो आणि उचल – साचल करता येतो.
# रेनपाईप ची जोडणी करणे अतिशय सोपे आहे.
# रेनपाईप मध्ये लेझर तंत्रज्ञान वापरून झिगझॅग आकारात छिद्रे केलेली असतात.
# जेंव्हा रेनपाईपमधून पाणी सोडले जाते तेंव्हा रेनपाईप वरील छिद्रांतून दोन्ही बाजूस १० फुटापर्यंत पाणी फवारले जाते.
# रेनपाईप मधून फवारले जाणारे पाण्याचे तुषार हे पावसाप्रमाणे असतात.
# रेनपाईप चा व्यास ( डायामीटर ) साधारणतः ४० मि.मी व लांबी हि १०० मीटरची असते.
# रेनपाईप हा व्हर्जीन प्लास्टिक मटेरियल पासून बनलेला असल्याने आणि त्यात UV स्टॅबिलायझर असल्याने # तो उन्हात खराब होत नाही म्हणून त्याचे आयुष्य ३ ते ४ वर्षे एवढे असते.
# रेनपाईप कमी कालावधीच्या पिकांसह ५ फुट उंचीच्या पिकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे.
# रेनपाईप द्वारे चांगल्या रीतीने पाणी फवारले जाण्यासाठी पाण्याचे प्रेशर १ ते १.५ कि.ग्रॅ / से.मी2 असायला पाहिजे.
# रेनपाईपच्या वापरामुळे पाण्याची आणि विजेची ५० % पेक्षा अधिक बचत होते.
# रेनपाईपमुळे कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी मजूर वापरून प्रभावीरित्या सिंचन करता येते.
# हाय डिस्चार्ज फास्ट इरिगेशन.
# लेझर पंचिंग टेक्नोलॉजीमुळे अतिशय कमी मेंटेनन्स.
# पाण्याच्या योग्य फवारणीमुळे थंड वातावरण निर्मिती होते जी अनेक पिकांसाठी उपयुक्त आहे.
# तुषार सिंचनापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध.
उपयुक्तता :
भाजीपाला पिके, फुलशेती व कांदा ह्यांच्यासाठी रेनपाईप हा स्वस्त व चांगला पर्याय आहे.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव हि सिंचन क्षेत्रात नावाजलेली कंपनी आहे आणि उत्कृष्ट दर्जाच्या हिरा रेनपाईप ची निर्मिती आणि विक्री करते. हिरा रेनपाईप विषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रेनपाईप चे एकरी गणित :

रेनपाईप वापर प्रणाली :

This post is also available in:
मराठी
Leave a reply