नाही बसत ना विश्वास ! कि कमी किंमतीत स्प्रिंकलर आपण बसवू शकतो ? होय, हे शक्य आहे हिरा रेनगन स्प्रिंकलर इरिगेशन मधील आधुनिक स्प्रिंकलर जे लांब अंतरापर्यंत सहज पाणी फवारू शकते आणि करू शकते आपल्या शेताचे सिंचन. आजपर्यंत अनेक कंपन्यांनी रेनगन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला पण गुणवत्ता / आकार / किंमत ह्यामुळे त्यांच्या रेनगन यशस्वी होऊ शकल्या नाहीत. आम्ही अभिमानाने सांगू शकतो को कि हिरा रेनगन भारतातील अनेक राज्यातील शेतकरी यशस्वी रित्या वापरीत आहेत. तरीही आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना रेनगन विषयी प्रश्न पडतात त्याचीच उत्तरे आम्ही ह्या लेखातून देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
Contents
- 1 १) रेनगन साठी आम्ही कोणत्या मोटारीचा वापर करू शकतो ?
- 2 २) आमच्याकडे असलेली मोटर योग्य एच.पी ची आहे पण रेनगनला आवश्यक प्रेशर मिळते आहे कि नाही हे कसे ठरवावे ?
- 3 ३) समजा प्रेशर जास्त झाल्याने पाईप फुटण्याची शक्यता आहे तर त्यावर काय उपयोजना करावी लागेल ?
- 4 ४) आमचे शेत गोलाकार नसून आयताकृती असेल तर रेनगन मुळे काही भाग कोरडा राहील काय ?
- 5 ५) रेनगन च्या पाण्याच्या माऱ्याने आमच्या पिकाचे नुकसान तर होणार नाही म्हणजे पिके झोडपली तर जाणार नाहीत ना ?
१) रेनगन साठी आम्ही कोणत्या मोटारीचा वापर करू शकतो ?
उत्तर :- रेनगन हि साधारणतः २.५ कि.ग्रॅ पाण्याच्या दबावावर काम करणे सुरु करते आणि ४ कि.ग्रॅ पाण्याच्या दबावावर तिच्या पूर्ण क्षमतेने काम करते. आम्ही ह्यासाठी रेनगन करिता ३ एच.पी. ची मोटार वापरण्याचा सल्ला देतो ज्यावर तुम्ही एक रेनगन चालवू शकता. ५ एच.पी मोटर असल्यास २ आणि ७.५ एच.पी असल्यास तीन रेनगन चालू शकतात. परंतु ह्या साठी तुम्ही किती खोलीवरून पाणी उचलत आहात, किती लांबीपर्यंत पाणी नेणार आहात, विजेची उपलब्धता ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ह्या सर्व बाबी व्यवस्थित असतील तर २ एच.पी वर सुद्धा रेनगन चालू शकते. तुम्ही रेनगन करिता सौरपंप, डीझेल इंजिन, पाणबुडी मोटार, सबमर्सिबल मोटर अशी कोणतीही मोटर वापरू शकता.
२) आमच्याकडे असलेली मोटर योग्य एच.पी ची आहे पण रेनगनला आवश्यक प्रेशर मिळते आहे कि नाही हे कसे ठरवावे ?
उत्तर :- तशी आम्ही रेनगन स्टॅण्ड वर प्रेशर मीटर बसविण्याची सोय केलेली आहे परंतु प्रश्न हा पडतो कि रेनगन खरेदी करण्याआधी कसे समजणार आवश्यक प्रेशर मिळते आहे कि नाही ? ह्यासाठी आमचा ठोकताळा वापरा कि ३ एच.पी वर एक / ५ एच.पी वर दोन आणि ७ एच.पी वर साधारणतः ३ रेनगन चालू शकतात.
क्षेत्र मोठे असले आणि जास्त रेनगन लावायच्या आहेत तर एक बाय पास मोटर जवळ काढून ठेवा हळू हळू व्हाल्व बंद करून किती रेनगन चालतात ते बघा आणि त्यानुसार बाय पास व्हाल्व उघडा ठेवा. म्हणजे प्रत्येक रेनगनला आवश्यक प्रेशर मिळेल.
एका पेक्षा अधिक रेनगन लावायच्या असतील स्प्रिंकलर इरिगेशन च्या नियमावली नुसार त्यांचातील अंतर असे असावे कि जास्तीत जास्त ओव्हरलॅपिंग होईल जेणेकरून कुठलाच भाग कोरडा राहणार नाही. खाली दिलेल्या आकृतीत बघा-

३) समजा प्रेशर जास्त झाल्याने पाईप फुटण्याची शक्यता आहे तर त्यावर काय उपयोजना करावी लागेल ?
उत्तर :- ह्यासाठी आमचा एक प्रोडक्ट आहे हिरा प्रेशर रिलीफ व्हाल्व ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज पाण्यचे प्रेशर गरजेनुसार सेट करू शकता. जास्त प्रेशर झाल्यास अतिरक्त पाणी बाहेर काढून हा व्हाल्व प्रेशर नियमित करतो.

४) आमचे शेत गोलाकार नसून आयताकृती असेल तर रेनगन मुळे काही भाग कोरडा राहील काय ?
उत्तर :- नाही, रेनगन मधील पाणी दोन ठिकाणाहून बाहेर पडते एक नोझल जवळ पाणी मारते तर दुसरे लांबवर पाणी मारते. तसेच रेनगन आपण 0 ते 360 डिग्री कोनात कितीही अंशावर लॉक करू शकतो ज्यामुळे शेतातील सर्व भाग भिजविता येतो. तशी व्यवस्था रेनगन मध्ये दिलेली आहे. खालील आकृती बघा –

५) रेनगन च्या पाण्याच्या माऱ्याने आमच्या पिकाचे नुकसान तर होणार नाही म्हणजे पिके झोडपली तर जाणार नाहीत ना ?
उत्तर :- रेनगनला आवश्यक तेवढे प्रेशर मिळत असल्यास ती पावसासारखे पाणी पिकांवर फवारते. रेनगन मधून बाहेर पडणारे पाण्याचे थेंब छोटे असतात त्यामुळे पिकांना नुकसान पोहचत नाही. पाण्याचे प्रेशर कमी झाल्यास मात्र पाण्याचा थेंब जाड पडू शकतो.
असे प्रश्न शेतकरी बांधवाना पडत असतात. आपल्यालाही रेनगन विषयी काही प्रश्न असल्यास आम्हाल कमेंट करून जरूर कळवा म्हणजे आम्ही तुमचे समाधान करू शकू.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव ( महाराष्ट्र ) सिंचन क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी असून आमची उत्पादने संपूर्ण भारतभर शेतकरी बांधव समाधानाने वापरीत आहेत. आपणास हि आधुनिक स्प्रिंकलर प्रणाली ‘ हिरा रेनगन ’ खरेदी करावयाची असेल तर आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या www.heeraagro.com
-
हिरा रेन गनचा पूर्ण संच (1.25”)Product on sale₹7,950.00 – ₹8,250.00
-
रेनगन (1.50″)Product on sale₹5,000.00
-
हिरा रेनगन (1.25″)Product on sale₹4,000.00
-
रेनगन स्टॅंड (1.50″)₹3,500.00
-
रेनगन स्टॅंड (1.25″)₹3,000.00
-
हिरा फ्लेक्स पाईपProduct on sale₹2,500.00
-
फुट बॉटम (HDPE Adapter)₹700.00
-
सर्व्हिस सॅडल₹400.00
One comment on “इतक्या कमी किंमतीत स्प्रिंकलर होईल ?”
Vishwanath chipade
Sir sprinkler pipe what is price 20 ft