फिल्टर ला ठिबक सिंचनाचा ‘ आत्मा ’ असे म्हणतात. परंतु, बऱ्याच वेळेस असे प्रश्न पडतात कि कोणते फिल्टर बसवावे ? किती इंचाचे फिल्टर बसवावे ? आपल्या मोटार नुसार फिल्टरची साईझ कशी निवडावी ?
सहज गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो, एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन ची हि गोष्ट आहे. त्याच्याकडे एक छोटी आणि एक मोठी अश्या दोन मांजरी होत्या. त्यांना घराबाहेर जाण्यासाठी सारखे दर उघडावे लागत असे. त्यावर उपाय म्हणून त्याने दरवाज्याला दोन छिद्रे पडली ज्यातून त्या ये – जा करू शकतील. पण त्याने हा विचार नाही केला कि मोठ्या छिद्रातून लहान मांजर हि जाऊ शकेल !
कशी ठरवाल फिल्टरची साईझ ?
असेच काही फिल्टर संबंधात सुद्धा आहे. फिल्टर बाबत मुख्य बाब आहे कि फिल्टर नेहमी जास्त कॅपासिटीचाच लावला पाहिजे किंवा पाईपची जी साईझ आहे त्यानुसार त्या आकाराचा फिल्टर वापरला पाहिजे.
१) २’’ पाईपलाईन असेल तर कमीत कमी २’’ चा किंवा त्यापेक्षा मोठा लावावा.
२) २.५’’ पाईपलाईन असेल तर फिल्टर २’’ लावून भागणार नाही त्यासाठी २.५’’ किंवा ३’’ फिल्टर लावावा.
३) ३’’ पाईपलाईन साठी ३’’ चा फिल्टर वापरावा.
फिल्टर कोणतेही असो त्यामधील फिल्टर इलेमेंट किंवा जाळीवर घाण साचून कालांतराने त्याची कॅपासिटी कमी होत जाईल. म्हणून फिल्टर कधीही उच्च क्षमतेचाच वापरावा.
आता प्रश्न हा पडतो कि – मोटरच्या कॅपासिटीचा फिल्टर निवडण्याशी काही सबंध नाही का ? किती Hp ची मोटर आहे ह्याचा काही संबंध येत नाही का ? फक्त पाईपलाईनचाच विचार करायचा का ?
ह्याचे उत्तर असे आहे कि आपण मोटारच्या कॅपासिटीनुसारच पाईपलाईन निवडतो त्यामुळे त्यासाबंधीचे सामान्य ज्ञान आपल्याला चांगले अवगत आहे. म्हणून फिल्टर निवडताना पाईपलाईन किती आकाराची आहे त्यानुसार निवडणे सोपे जाते.
-
सेमी ऑटोमेटीक डिस्क फिल्टर₹4,500.00 – ₹6,100.00
-
हिरा डिस्क फिल्टरProduct on sale₹3,300.00 – ₹4,700.00
-
प्लास्टिक स्क्रीन फिल्टरProduct on sale₹1,800.00 – ₹2,800.00
-
शंकु फिल्टरProduct on sale₹4,500.00 – ₹5,700.00
-
वाय टाईप फिल्टर₹500.00 – ₹1,500.00
-
हिरा सुपर क्लीन फिल्टर₹1,200.00 – ₹1,800.00
-
हिरा सॅन्ड फिल्टर₹15,500.00 – ₹25,500.00
-
सेमी ऑटोमॅटिक फिल्टरProduct on sale₹3,200.00 – ₹3,600.00
Leave a reply