गांडूळ खताची निर्मिती ही कोणीही व कोठेही करू शकतो. शेतकरी तसेच भूमिहीन मजुरांसाठी देखील हा एक जोडधंदा उपयुक्त ठरतो. बाग बगीचे, शाळा, महाविद्यालय मोठी हॉटेल्स इत्यादी सर्वच ठिकाणी गांडूळ खताची निर्मिती करून तेथील पार्कमध्येच उपलब्ध झाडांना त्याचा खत म्हणून उपयोग करता येऊ शकतो. त्याचे सविस्तर विवेचन खालीलप्रमाणे.
👉👉शेतीसाठी (Agriculture):-
आज दिवसेंदिवस भयानक रसायनयुक्त कीटकनाशकांचा तसेच खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत करून वरील सर्व अडचणींवर मात करता येईल. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. बरेचशे शेतकरी स्वतः गांडूळ खताची निर्मिती करून स्वतःच्या शेतामध्ये त्या खताचा वापर करतात व उरलेल्या खताची विक्री करतात. हा शेतीसाठी एक पूरक व्यवसायदेखील आहे. गांडूळासाठी लागणारे खाद्य कमीत कमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत व सेंद्रीय खत यांचे मिश्रण अर्धे अर्धे वापरुन गांडूळ खत(vermi compost) तयार करता येते.
गांडूळ खाद्यामध्ये शेतातील ओला पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकाचे अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड यांचा वापर होऊ शकतो. गांडूळखाद्य नेहमी बारीक करुन टाकावे, बायोगॅस प्लॅन्टमधून निघालेली स्लरीसूध्दा गांडूळ खाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्डयामध्ये गांडूळे टाकण्याअगोदर गांडूळ खाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे. म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल.
👉👉शाळा व महाविद्यालय (Schools & colleges):-
शाळा व महाविद्यालयांमध्ये जागा पुरेशी उपलब्ध असते. तेथील निघणारा काळीकचरा, पालापाचोळा व ईतर कचरा याचे योग्य व्यवस्थापन करून त्याद्वारे गांडूळ खत निर्मिती करता येऊ शकते. असे केल्याने परिसर स्वच्छ तर राहतोच शिवाय शाळा परीसारतील बाग व झाडांना मोफत व उच्च गुणवत्ता असलेले खतही मिळेल.
👉👉उद्यानांमध्ये (Garden):-
उद्यानांमध्ये विविध प्रकारची झाडे लावलेली असतात. बऱ्याच उद्यानांमध्ये गांडूळ खताचा वापर करून झाडांची लागवड केलेली असते. त्यासाठी संबधित उद्यानांमध्येच गांडूळ खत निर्मिती केल्या जाऊ शकते.
👉👉गृहनिर्माण संस्थेत (Housing Socities):-
गृहनिर्माण संस्थेत विविध प्रकारचा कचरा रोज निघत असतो. व जवळपास सर्वच सोसायट्यांमध्ये लहान मोठ्या प्रमाणवर स्वतंत्र बाग उपलब्ध असते. तेथील बागेची देखभाल करण्यासाठी संस्थेला बराच खर्च देखील येतो. गृहनिर्माण संस्थेत गांडूळ खत सहज व अगदी कमी खर्चात निर्माण करता येतील. सदस्यांच्या घरातील तसेच घराबाहेरील कचऱ्याचा वापर गांडूळ खत नर्मितीसाठी करता येईल. त्यामुळे सोसायटीचे कचरा व्यवस्थापन हे कार्य तर होईलच शिवाय सोसायटी स्वतःच्या परिसरात निर्माण केलेलं गांडूळ खत आपल्या बागेतील झाडांना देवून उररलेल्या खतांची विक्री देखील करू शकते.
👉👉मोठमोठी हॉटेल्स (Hotels):-
मोठमोठ्या पंच तारांकित हॉटेल्स मध्ये विशेष करून त्यांच्या कडील बागांच्या देखभालीसाठी विशेष लक्ष दिले जाते. तेथील उपलब्ध बाग व झाडांमुळे संबधित हॉटेल्स ह्या शोभून दिसतात. अशाप्रकारच्या हॉटेल्सच्या परिसरात गांडूळ खत निर्माण करून तेथील बागांसाठी खताची सोय केल्या जाऊ शकते.
👉👉मोठ्या कंपन्या (Industry):-
कंपन्यांमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर केर कचरा निघत असल्याने तेथे सुद्धा व्हर्मी बेड चा वापर करून गांडूळ खताची निर्मिती करता येते. सदरील खताची विक्री करून कंपनी आर्थिक लाभ मिळवू शकते शिवाय जर कंपनीमधील झाडांसाठी खतही मिळेल.
👉👉टेरीस फार्मिंगमध्ये (Terrace farming):-
छतावरील फुलशेती आजकाल प्रचलित आहे. स्वतःच्या टेरीस वर उभारण्यात आलेल्या छोट्याशा शेतीला खताची गरज भासते. अशावेळी जर आपणच आपल्या परिसरात गांडूळ खताची निर्मिती केली तर ते अधिक फायद्याचे ठरेल व आपली गरज भासल्यास उर्वरित खताची विक्री देखील करता येईल. तसेच त्यामधून मिळालेला पैसा टेरीस फार्मिंगमध्ये पुन्हा गुंतवता येईल.
तर अशाप्रकारे विविध ठिकाणी आपण गांडूळ खताची निर्मिती करून सेंद्रिय शेतीला हातभार लावू शकतो त्याच बरोबर एक अतिरिक्त व्यवसाय म्हणून देखील त्याकडे बघू शकतो.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजने (Heera Agro Industries) गांडूळ खत बनविण्यासाठी लागणारे व्हर्मी बेड (vermi bed) अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत. व्हर्मी बेड नावाजलेल्या सुप्रीम कंपनीच्या 250 GSM असलेल्या ताडपत्री पासून बनलेले आहेत. यांचे वैशिष्ट्ये असे कि हे सहजरीत्या स्थलांतर करता येतात. ठराविक पद्धतीने हे बनलेले असल्याने बांबूच्या साहाय्याने उभे करता येतात यामुळे अगदी सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते. ज्यामुळे गांडूळ खताची गुणवत्ता देखील चांगली मिळते, व्हर्मीवॉश जमा करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशी पद्धत आहे. साधरणतः व्हर्मी बेड चे आयुष्य 10 वर्ष आहे. 8x4x2 फूट, 12x4x2 फूट ही हिरा व्हर्मी बेड उपलब्ध आहेत. त्यातून वर्षाकाठी 6-7 टन गांडूळ खत आपण तयार करू शकतो. तसेच गांडुळे जमिनीत निघून जाण्याची भीती नसते, अत्यंत उपयोगी असा घटक व्हर्मीवाँश पूर्णपणे जमा करता येते.
हवामान, पीक, सिंचन विषयक कृषि सल्ला प्राप्त करण्यासाठी कृपया खालील लिंकवर click करून फॉर्म भरा. हि माहिती आपल्याला व्हाट्सएप वर विनामूल्य मिळेल.
👉 http://whatsapp.heeraagro.com/
हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000511 / 9284000512 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000516 / 9284000517 संपर्क साधुन.
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!
This post is also available in:
मराठी
3 comments on “गांडूळ खत (vermi compost) कोठे व कसे निर्माण करता येईल?”
शाहाजी विठ्ठल भांगे
गांडूळ खत तयार आहे
9689259860
SAGAR PATIL
सर नमस्कार
मी सागर पाटील रा .भिलाली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव
सर मला घरगुती म्हणजे टेरेस वर गांडूळ खत निर्मितीचा एक लहान सा प्लान्ट चालू करायचा आहे जर तुमच्या मार्गदर्शन लाभले तर भविष्यात मोठे प्लान्ट तयार करण्याची इच्या आहे
Girish Khadke
▶️अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9284000515 / 9284000516 / 9284000517 / 9307300145 / 9307300146 / 9307300147 / 9307300148 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)