जमिनीची सुपीकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सेंद्रिय खते महत्वाची ठरतात.जमिनीची सुपीकता जैविक व भौतिक गोष्टीवर अवलंबून असते. लागवडीचे पिक न बदलता नेहमी त्याच पिकाची लागवड केली जाते.लागवड करताना रासायनिक खताचा वापर जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेचे प्रमाण कमी होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करून जमिनीची उत्पादनक्षमता वाढवता येते. गांडूळ खतात जमिनीस व पिकास आवश्यक अशा जवळपास सर्वच पोषक तत्वांचा समावेश असतो. अशा प्रकारे सेंद्रीय शेती करण्यासाठी गांडूळ खत उत्तम पर्याय आहे.
गांडूळखतासाठी गांडूळाचे प्रकार
- इओसिना फोटीडा
- युड्रिलिस युजीनी
- ऑस्ट्रीलिअन स्प्रिंग अर्थवर्म
गांडूळाची ओळख
फिकट गुलाबी रंगाचे गांडूळ असतात. या गांडूळाच्या अंगावर गोलाकार आकाराचे वलय असतात. हि दिसायला जाड व शरीराच्या रचनेत मागे पुढे निमुळता भाग असतो. हि गांडुळे ८० टक्के कुजलेले मटेरिअल खातात व फक्त २० टक्के माती खातात. यांच्यापासून खत जास्त प्रमाणात मिळते. हे गांडूळ ६०००ते ७००० अंडी घालतात. प्रजनन क्षमता २७ दिवसात डबल होते. गांडूळखतामध्ये नायट्रोजन, फॉसफरस, पोटॅशीअम ची मात्रा जास्त प्रमाणात असते.
गांडूळ निर्मितीची प्रक्रिया
गांडूळाची पैदास करण्याच्या जागेची जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. जवळ मोठी झाडे असू नयेत. गांडूळ निर्मितीसाठी ८ ते ९ सेमी उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा ,पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. या थरावर गांडूळ सोडावीत. यावर ५ ते ६ सेमी जाडीचा कुजलेले शेणखत, लेंडीखत ,सेंद्रिय खत याचा थर द्यावा. त्यावर ओल होईपर्यत पाणी शिंपडावे त्यानंतर या थरावर २० ते ३० सेमी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रिय खत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणी शिपडावे म्हणजे ओलावा टिकून राहील आणि गांडूळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पद्धतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते. त्याचप्रमाणे घरातील कचरा सांडपाणी तसेच स्वयंपाकघरातील कचरा सुध्दा वापरता येतो.शेणखतामध्ये गांडूळाची वाढ उत्तम होते.त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. गांडूळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रिय खत यांचे मिळून गांडूळखत करता येते. गांडूळ खत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतीने करता येते. पद्धत कोणतीही असो परंतु खताचे तापमान नियोजित ठेवावे. ढीग किंवा खड्डा कृत्रिम सावलीत करावा.
`गांडूळ खताचे फायदे
- जमिनीचा पोत सुधारतो
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
- गांडूळांच्या बिळांमूळे झाडाच्या मुळाला इजा न होता मातीची उत्तम मशागत होते.
- जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
- जमिनीची धूप कमी होते.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
- गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
- जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या भरमसाठ वाढते.
- ओला कचरा व्यवस्थापन होते.
- मातीचा कस टिकून राहतो
- या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.
- जमीन सुपीक राहते.
अशा प्रकारे गांडूळखताचा उपयोग करू शकतो. जमिनीचा पोत तर सुधरतोच त्याबरोबर उत्पादन क्षमता देखील वाढते.
3 comments on “गांडूळ खत (vermi compost) कोठे व कसे निर्माण करता येईल?”
शाहाजी विठ्ठल भांगे
गांडूळ खत तयार आहे
9689259860
SAGAR PATIL
सर नमस्कार
मी सागर पाटील रा .भिलाली तालुका अमळनेर जिल्हा जळगाव
सर मला घरगुती म्हणजे टेरेस वर गांडूळ खत निर्मितीचा एक लहान सा प्लान्ट चालू करायचा आहे जर तुमच्या मार्गदर्शन लाभले तर भविष्यात मोठे प्लान्ट तयार करण्याची इच्या आहे
Girish Khadke
▶️अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9284000515 / 9284000516 / 9284000517 / 9307300145 / 9307300146 / 9307300147 / 9307300148 संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)