रेनगन इरिगेशन म्हणजे नेमके काय ? कोणत्या पिकांच्या सिंचनासाठी रेनगन वापरता येईल ? विविध पिकांसाठी रेनगनचा उपयोग कसा करायचा ? ओलिताचे क्षेत्र आणि पिकाचा प्रकार ह्यानुसार रेनगन इरिगेशन सिस्टीम ची उभारणी / डिझाईन कशी करायची ? पिकानुसार रेनगन डिझाईन मध्ये कसा फरक पडेल ? रेनगन किती क्षेत्र भिजवते ? एक एकर क्षेत्रासाठी रेनगन चा वापर कसा करायचा ? खेळाचे मैदान, लन आणि गोल्फ कोर्स साठी रेनगन चा वापर आणि डिझाईन कशी करण्यात येते ? रेनगन डिझाईन करण्यासाठी कोण-कोणते साहित्य लागेल ? रेनगन पाण्याच्या किती दाबावर व्यवस्थित काम करू शकते ? रेनगन हि तुषार सिंचनातील एक आधुनिक पद्धत का म्हणून ओळखली जाते ? रेनगन – आधुनिक स्प्रिंकलर पद्धतीच्या ओळखीपासून ते रेनगन इरिगेशन पद्धतीच्या संपूर्ण डिझाईन बद्दल आम्ही तुम्हाला ह्या लेखाद्वारे माहिती देणार आहोत !
रेनगन इरिगेशन म्हणजे काय ?
स्प्रिंकलर / तुषार सिंचन प्रणालीतील अतिआधुनिक प्रकार म्हणजे पिकांना वर्तुळाकार पावसासारखे फवारून पाणी देण्यासाठी विकसित केलेली तुषार सिंचन पद्धती- हिरा रेनगन .
रेनगन पद्धतीची वैशिष्ठ्ये :-
१) पिकांवर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावणसरीसारखे रीमझिम पडते.
२) जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात.
३) रेनगन डोंगराळ, चढ-उताराच्या जमिनी, ओलितासाठी सहज वापरता येते.
४) पानावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून व किडींपासून संरक्षण मिळते.
५) अति उन्हात व कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आद्रता वाढते व त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते.
६) वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते. अश्या वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन फायदेशीर आहे.
७) पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक पाण्यात मिसळून द्रवरुपात पिकाला मिळतात.
८) विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलीअर स्प्रे प्रमाणे अन्न्न्घटक पिकास मिळतात.
९) रेनगनचे पाणी पावसासारखे पडत असल्याने पिकांच्या पानावरील धूळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो. त्यामुळे अन्नद्रव्ये तयार करण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते व उत्पादन वाढते.
रेनगन कुठल्या पिकांसाठी उपयोगी पडते ?
ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान, खेळाचे मैदान, गोल्फ कोर्स, ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.
रेनगन इरिगेशन सिस्टीम शेतात कशी उभारावी ?
अ) रेनगन इरिगेशन सिस्टीम उभारणी साठी आवश्यक निकष / सामग्री :-
१) मोटार चा किमान Hp :- 3 Hp
२) पाण्याचा आवश्यक दाब :- 2.5 कि.ग्र / स्क्वे.से.मी वर रेनगन काम करण्यास सुरुवात करते पण चांगल्या परिणामासाठी पाण्याचा दाब 4 कि.ग्र / स्क्वे.से.मी असावा.
३) पाईप :- आपण रेनगन GI, स्प्रिंकलर पाईप किंवा PVC पाईप पैकी कोणत्याही पाईपवर उभारू शकतो
४) सर्व्हिस सॅडल :- PVC पाईपवर रेनगन उभारण्यासाठी उपयोगी.
५) फुट बॉटम :- स्प्रिंकलर पाईपवर रेनगन उभारण्यासाठी उपयोगी.
६) प्रेशर मीटर :- पाण्याचा आवश्यक दाब मिळतो आहे किंवा नाही हे समजण्यासाठी उपयोगी.
७) प्रेशर रिलीफ व्हाल्व :- पाण्याच्या अति दबावामुळे कधी – कधी पाईपलाईन फुटण्याची शक्यता असते तेंव्हा यंत्रणेत प्रेशर रिलीफ व्हाल्व हा व्हाल्व लावलेला असल्यास हा धोका टाळता येतो.
८) ट्रायपॉड स्टॅण्ड :- तीन पायाचे पक्के GI पासून बनलेले, ओल्या मातीत स्टॅण्ड धसणार नाही असे ट्रायपॉड स्टॅण्ड घ्यावे.
ब) रेनगन इरिगेशन सिस्टीम उभारणी :-
१) सर्व प्रथम आपण वापरत असलेल्या पाईप च्या प्रकारावर रेनगन उभारणीसाठी आवश्यक त्या जोडणीचे साहित्य घ्या.
२) जोडणीच्या साहित्यात रेनगन प्रकारानुसार ( १.२५ ’’ किंवा १.५०’’ ) तोंड दिलेले असते तसेच पाईप बसविण्यासाठी देखील एक तोंड दिलेले असते. त्या मधील वरच्या बाजूच्या तोंडावर रेनगनचे ट्रायपॉड स्टॅण्ड बसवा.
३) ट्रायपॉड स्टॅण्डवर एक बाजूस प्रेशर मीटर बसविण्यासाठी जागा दिलेली आहे तिथे पाण्याचा आवश्यक दाब मिळतो आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेशर मीटर बसवा.
४) ट्रायपॉड स्टॅण्डवर वरचे बाजूस आतील आटे असणारी रेनगन बसवा.
५) एका बाजूचे क्षेत्र ओले करून घ्यावयाचे असल्यास रेनगनला 0 – 360 डिग्री कोनात गोलाकार फिरविण्यासाठी जी लॉक अॅरेंजमेंट दिलेली आहे तिचा उपयोग करून आवश्यक दिशेत रेनगन लॉक करून घ्या.
६) स्पिंकलर प्रणालीत उचल साचल करण्याची मुभा असते त्यामुळे आपण रेनगनचा उपयोग खालील प्रकारे करू शकतो.
रेनगन वापर करण्याची पध्दत:-
- पोर्टेबल यंत्रणा : या यंत्रणेत स्प्रिंकलर कपलर पाईप द्वारे रेनगनला संपूर्ण शेतात आवश्यकतेनुसार फिरवू शकतो.
- सेमी परमनंट यंत्रणा : या यंत्रणेत भूमिगत एचडीपीई अथवा पीव्हीसी मुख्य पाईपलाईन लावून पम्पाच्या दबावानुसार 150-170 फूटवर आउटलेट काढून स्प्रिंकलर कपलर पाईप द्वारे रेनगन संपूर्ण क्षेत्रात (शेतात) फिरवू शकतो.
- परमनंट यंत्रणा : या यंत्रणेत शेताची लांबी व रुंदी नुसार मेन आणी सबमेन एचडीपीई अथवा पीव्हीसी पाईपलाईन लावून पम्पाच्या दबावानुसार 150-170 फूटवर आउटलेट काढून रेनगन द्वारे सिंचन करता येते.
क) रेनगन चालवण्यासाठी लागणारे पंप :-
रेनगन ला 2.5 किलो / सें.मी. दबावावर चालवण्यासाठी 3 हॉर्स पॉवरच्या किमान १२० हेडच्या पंपाची गरज असते. तथापि, शेतीचे क्षेत्रफळ , पाईप लाईनची लांबी, खोल विहीर , रेनगन ची नोजल साईज ह्या सगळ्या बाबींमुळे गरजेनुसार पंपाची निवड करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्या.
ड) रेनगन वापरतांना घ्यावयाची काळजी :-
१) रेनगन आणि ट्रायपॉड स्टॅण्ड एका जागेवरून दुसरीकडे नेत असतांना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
२) रेनगनला तेल किंवा ऑईल लावू नये. त्यामुळे रेनगनच्या कार्यामध्ये अडथळा होऊ शकतो.
३) रेनगनचे नोझल कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नये.
४) ओलित संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
५) रेनगन सुरु करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी.
६) ट्रायपॉड स्टॅण्डची उभारणी अचूक झाली आहे ह्याची काळजी घ्यावी.
हिरा रेनगन चे फायदे:-
१) एकाच जागेवरून अर्धा ते एक एकर मध्ये पाण्याचा दबावानुसार ७-८ नोझल वापरण्याऐवजी एकच रेनगन वापरून तुषार सिंचन करता येते. छोटे-छोटे स्प्रिंकलर वापरल्याने एका सिंचना नंतर ५० फूट पाईपलाईन सरकवावी लागत होती पण रेनगन द्वारे १५०-१७० फूट पर्यंत आपण पुढे सरकू शकतो. त्यामुळे वेळ आणि श्रमासोबतच विजेचीही बचत होते. हिरा रेनगन २११ लिटर प्रती मिनिट पाणी फवारते.
२) एक नवीन आधुनिक सिंचन पध्दत त्याच बरोबर वजनात हलकी आणी हाताळण्यासही सोपी जाते.
३) वेळेवर शेती सिंचन करण्यासाठी अतिशय उपयुक्त पडते. पेरणी करण्याआधी रेनगन द्वारे हलकेसे पाणी फवारल्याने अनावश्यक गवत / तण निर्माण होत नाही.
४) उन्हाळात रेनगन द्वारे पाणी फवारल्याने कमीतकमी पाण्याच्या उपयोग केला जातो, कमी वेळात लागवण केली जाते.
५) हिरा रेनगन द्वारे फवारणी केल्याने पिकाची पाने नीट धोतली जातात त्यामुळे किटकाचा प्रभाव कमी होतो तसेच पिंकामध्ये अन्ननिर्मितीची प्रकिया चांगल्या प्रकारे होऊन पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते.
६) चढ-उतार असलेल्या जागे वर रेनगन द्वारे एकसमान सिंचन केले जाते.
७) हिरा रेनगन ने नियंत्रित सिंचन होत असल्यामुळे नाजूक पिंकाना नुकसान पोहचत नाही.
८) साधारणतः २ तास रेनगन चालवण्याने १.२ इंच जमीन ओलसर होईल इतका पावसासारखा फवारा होतो . इतका ओलसरपणा शेतजमीनीला पुरेसा असतो.
९) हिरा रेनगनला एक विशिष्ठ प्रकारचा अॅडाप्टर असल्याने कोणत्याही प्रकारच्या स्प्रिंकलर पाईपला आपण ती जोडू शकतो.
१०) हिरा रेनगन ची देखभाल अत्यंत कमी खर्चात होते. पूर्णपणे भारतीय बनावटीची असल्यामुळे व ISI प्रमाणित असल्याने सर्व प्रकारचे पार्टस उपलब्ध होतात आणी पूर्णपणे गॅरंटी सोबतच विकली जाते.
हिरा रेनगन चे प्रमुख वैशिष्टे :-



ह्या रेनगनसोबत ३ प्रकारचे नोझल दिलेले असल्यामुळे विविध प्रकारे पाणी फवारता येते, जसे कि पाण्याच्या फवाऱ्याची लांबीकमी – जास्त करता येते व फवाऱ्यातील तुषारांच्या थेंबाची लहान – मोठी करता येते.
हिरा रेनगन किट




फुट बॉटम

रेनगन विषयी विचारले जाणारे नेहमीचे प्रश्न :-
प्रश्न :- रेनगन ( Rain-gun ) म्हणजे काय ?
उत्तर :- रेनगन हा तुषार सिंचनाचा एक आधुनिक प्रकार आहे ज्याच्याद्वारे पाणी पिकांवर पावसासारखे फवारले जाते.
प्रश्न :- रेनगनच्या वापरामुळे संपूर्ण शेतीक्षेत्र ओलित होऊ शकते का ?
उत्तर :- रेनगनला दोन आउटलेट दिलेले असल्यामुळे पिकांच पूर्ण क्षेत्र हे पाण्याने भिजवल्या जाते. रेनगनचा जो वरचा आउटलेट आहे तो दूरचे पिक भिजवण्याच काम करतो आणि जो खालच्या बाजूचा आउटलेट समोर आहे तो जवळचे पिक भिजवण्याचे काम करतो. त्यामुळे कोणताच भाग हा कोरडा राहत नाही.
प्रश्न :- रेनगन चा वापर कसा फायदेशीर आहे ?
उत्तर :- रेनगन हि 360 अंशामध्ये गोलाकार फिरवून आपण पिकांवर पावसासारखे पाणी फवारू शकतो. दोन आउटलेट दिलेल्या असल्याने कुठलेच क्षेत्र कोरडे राहत नाही. सहजरीत्या कोठेही हलविता येते. त्यामुळे तसेच रेनगन हे एक ISI प्रमाणित उत्पादन असल्याने रेनगनचा वापर शेतकऱ्यांसाठी खूपच किफायतशीर व फायदेशीर आहे.
प्रश्न :- किती Hp च्या मोटरवर एक रेनगन चालते ? माझी मोटर १२ Hp ची आहे तर किती रेनगन चालतील ?
उत्तर :- रेनगणला काम करण्यासाठी ज्या Hp ची मोटर लागते ती किमान ३ Hp ची असावी. कारण जर ३ Hp ची मोटर असेल तर रेनगनला उत्तम प्रकारे काम करण्यासाठी ४ kg / Sq.cm चे प्रेशर ३ Hp च्या मोटरवर सहजपणे भेटून जाते. १२ Hp च्या मोटरवर ४ रेनगन सहज चालू शकतात. फक्त रेनगन व्यवस्थित चालण्यासाठी ४ kg / Sq.cm पाण्याच्या प्रेशरची गरज असते ते नियमित झाले पाहिजे.
प्रश्न :- एका रेनगनसाठी पाण्याचे प्रेशर किती असावे लागते ?
उत्तर :- जर रेनगनला २.५ kg / Sq.cm प्रेशर दिले तर ती काम करायला सुरुवात करते, पण तिला जर ४ kg / Sq.cm पाण्याचे प्रेशर मिळाले तर हि रेनगन उत्तम प्रकारे काम करते.
प्रश्न :- एका एकरसाठी किती रेनगन लागतील ?
उत्तर :- एका एकरसाठी साधारणतः दोन रेनगन लागतात.
प्रश्न :- जर आमचे क्षेत्र गोलाकार नसून चौकोनी असेल तर रेनगन कशी वापरता येईल, किनाऱ्यापर्यंत पाणी पोहचेल का ?
उत्तर :- रेनगनमध्ये आपण ० ते ३६० डिग्री अंशामध्ये फिरविण्यासाठी यंत्रणा ( Adustable lock ) दिलेली आहे त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार रेनगनला ९०,१८० किंवा ३६० अंशात फिरवून पाणी फवारू शकतो. रेनगन हि १७० फुट गोलाकार साईज मध्ये पाणी मारते. एका बाजूस ८५ फुट तर दुसऱ्या बाजूस ८५ फुट असे १७० फुटचे गोलाकार क्षेत्र भिजवीते.
प्रश्न :- रेनगन च्या प्रेशरमुळे पिकांना नुकसानी झाली किंवा पिक झोडपले गेले तर ?
उत्तर :- रेनगनला दोन आउटलेट दिलेल्या असतात दोन्ही आउटलेट समोर एक विशीष्ट प्रकारचा स्क्रू ( pressure dividing skrew ) बसवलेला असल्यामुळे प्रेशराईज्ड पाणी त्या स्क्रूला लावून विभाजित होते आणि पावसाच्या स्वरूपात पिकांवर पडते. त्यामुळे पिके पाण्याने झोडपली जात नाही.
प्रश्न :- रेनगनचा वापर करीत असतांना पाण्याच्या जास्त प्रेशरमुळे पाईपलाईन फुटण्याची शक्यता आहे का ?
उत्तर :- उत्तम प्रकारे काम करण्यासाठी रेनगनला ४ kg / Sq.cm पाण्याचे प्रेशर लागते जे ३Hp च्या मोटरने सहजपणे भेटून जाते. जर एखाद्या वेळेस जास्त Hp च्या मोटरवर जर रेनगन लावली तर जे जास्तीचे प्रेशर राहील ते बायपास करून घ्यावे. अन्यथा पाईपलाईनवर पाण्याचा जास्त दबाव आल्यामुळे ती फुटून जाईल. अन्यथा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पाईपलाईन जोडणीमध्ये प्रेशर रिलीफ व्हाल्व बसवून घ्यावा.
रेनगनची किंमत :-
1.25 ” रेनगनचे सॅम्पल कोटेशन ( PVC पाईप फिटिंगसाठी ) | |||||
अनु. क्र. | वस्तू विवरण | नग | किंमत /नग (Rs) | Total (Rs) | |
1) | 1.25” रेनगन | 1 | 3000=00 | 3000=00 | |
2) | रेनगन स्टॅण्ड | 1 | 2000=00 | 2000=00 | |
3) | सर्व्हिस सॅडल | 1 | 400=00 | 400=00 | |
4) | प्रेशर मीटर | 1 | 500=00 | 500=00 | |
Total | 5900=00 |
1.25 ” रेनगनचे सॅम्पल कोटेशन ( स्प्रिंकलर पाईप फिटिंगसाठी ) | |||||
अनु. क्र. | वस्तू विवरण | नग | किमत /नग (Rs) | Total (Rs) | |
1) | 1.25” रेनगन | 1 | 3000=00 | 3000=00 | |
2) | रेनगन स्टॅण्ड | 1 | 2000=00 | 2000=00 | |
3) | फुट बॉटम | 1 | 700=00 | 700=00 | |
4) | प्रेशर मीटर | 1 | 500=00 | 500=00 | |
Total | 6200=00 |
2 comments on “रेनगन उभारणी डिझाईन / रेनगन इरिगेशन सिस्टीम डिझाईन”
निलेश वाघमारे
रेनगण चालू असताना 360 डिग्री फिरते का
Raghunath Jangid
हो सर