हिरा ईझी टू फिट सेट पाईप लाईनच्या सर्व हेड युनिट घटकांना कमीत कमी जागेत व्यवस्थित सामावून घेते. ऐअर रिलीज वाल्व्ह, वेन्चुरी, प्रेशर मीटर, प्रवाह नियंत्रण करणारा वाल्व्ह आणि सहजतेने पाणी बाय-पास करण्याची सोय.
हिरा नॅनो व्हेन्चुरी हे एक छोट्या आकाराचे ( ०.७५’’ किंवा ३/४’’ ) व्हेन्चुरी इंजेक्टर आहे. शेतीमध्ये ड्रिप द्वारे खते देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. हि व्हेन्चुरी पाण्याच्या दबावामधील फरकाच्या तंत्रावर चालते हिला कुठल्याही इंधनाची गरज भासत नाही.
व्हेन्चुरी हे एक ISI प्रमाणित उत्पादन असून ते दबावामधील फरकाच्या तंत्रावर चालते ( व्हॅक्यूम ). ठिबक सिंचनाद्वारे पिकांच्या मुळांशी खते देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.