प्लास्टिक फिल्टर सारखेच सेमी ऑटोमॅटिक फिल्टर हे इंजिनिअरिंग प्लास्टिक मटेरियल चे बनवलेले असल्यामुळे उन्हाचा वातावरणाचा किहीही परिणाम यावर होत नाही.
इतर फिल्टर जर साफ करायचे असतील तर मोटर बंद करून ते उघडावे लागतात परंतु हे सेमी ऑटोमॅटिक फिल्टर चालू मोटर मध्ये न उघडता साफ होते.
बऱ्याच वेळा विहीर व शेतामध्ये बरेच अंतर असते त्यामुळे फिल्टर साफ करणे खूप त्रासाचे काम असते म्हणजे आधी मोटर बंद करण्यास जा आणि नंतर मग फिल्टर उघडून जाळी साफ करा आणि पुन्हा मोटर सुरु करण्यास जावे लागते, ह्यामुळे वेळ आणि मेहनत खूप लागतो.
यावर पर्याय म्हणजेच ” सेमी ऑटोमॅटिक फिल्टर ”
ह्या फिल्टर ला एक सेन्सर दिलेला आहे. फिल्टर चोक अप झालेले आहे कि नाही याची सूचना देते हे सेन्सर देते.
सेन्सर म्हणजेच लाल बटण जे फिल्टर ला दिलेले आहे, सेन्सर वरच्या दिशेने वर आल्यास फिल्टर चोकअप झालेय असे समजावे.
—————– फिल्टरसाफकरण्याच्याआवश्यकसूचना —————–
जेव्हा फिल्टर मधला दबाव जास्ती होतो ( फिल्टर चोकअप होते ) तेव्हा सेन्सर चे लाल बटन वर येते तेव्हा फिल्टर साफ करणे आवश्यक असते.
सेमी ऑटोमॅटिक फिल्टरची सफाई पाण्याचा प्रवाह चालू असतांनाच करावा.
फिल्टरच्या खाली एक Drain Valve दिला आहे तो हळू हळू उघडावा.
फिल्टरच्या वर जे हॅन्डल दिले आहे ते घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने सरळ व उलट्या दिशेने दोन ते तीन वेळा फिरवावे.
Shivaji Ramkisan Naikwade –
Very good product