गांडूळ खत म्हणजे काय?
गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वत:च्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
गांडूळ आणि जमिनीची रासायनिक सुपीकता
गांडूळे त्याचे निम्म्या वजनाचीमाती दररोज खात असतात. गांडूळे जमिनीत बिळे करतात. तेथील माती खाऊन मार्ग मोकळा करतात. एक चौरस मीटर जागेतील गांडूळे दरवर्षी ३.६ किलो माती खातात. त्यामुळे जमिनीच्या पृष्टभागावर ६० वर्षात १५ से.मी. जाडीचा थर तयार होतो. काही गांडूळे त्यांचे बिळातच विष्ठा टाकतात. गांडूळे माती खातात तेंव्हा सेंद्रीय पदार्थाबरोबरमातीचे कण त्याचे शरीरात आणखी बारीक होतात, त्यामुळे त्यांचे विष्टेतील मातीचे कण बारीक असतात. जमिनीच्या खोल थरातील माती गांडूळे पृष्टभागावर आणून टाकतात. याप्रमाणे गांडूळे हेक्टरी २ ते २.५ टन मातीची उलथापालथ करतात.
गांडूळाच्या विष्ठेतील मातीची कणीदार संरचना असते, त्यामुळे ही विष्ठा पाण्याने वाहून जात नाही. जमीन घट्ट बनत नाही. ओली व कोरडी जमीन भुसभुशीत राहाते. कणीदार संरचनेमुळे पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी जमिनीत मुरते, पृष्ठभागावरुन वाहून जात नाही. जमिनीतील पाण्याचा योग्यप्रकारे निचरा झाल्याने जमिनीत हवा खेळती राहते. गांडूळे नसलेल्या जमिनीपेक्षा गांडूळे असलेल्या जमिनीतून पाण्याचा निचरा ४ ते १० पटीने अधिक होतो. गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते व त्यामुळे सहजिकच पिकाचे उत्पादन वाढते. गांडूळामुळे जमिनीची जलधारणाशक्ती २० टक्के ने वाढते.
पिकांना अधिक पाणी मिळते व पर्यायाने पाण्याचा ताण सहन करावा लागत नाही.
गांडूळाच्या विष्टेत नत्राचे प्रमाण आजूबाजूच्या मूळ जमिनीच्या तुलनेत पाच पटीने जास्त असते. तर स्फुरद सात पटीने व पालाश अकरा पटीने जास्त असतात. ही प्रमुख अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध अवस्थेत मिळतात. त्याशिवाय कॅल्शियम व मॅग्नेशियम उपलब्ध अवस्थेत दुप्पट प्रमाणात विष्टेत असतात.
पिकाचे पोषक अन्नद्रव्ये | गांडूळांची विष्ठा | जमिनीचा थर | शेरा वाढीचे प्रमाण | |
० ते १५ सें.मी. | १५ ते २० सें.मी. | |||
सेंद्रीयपदार्थ (नत्रयुक्त) | १३.१ | ९.८ टक्के | ४.९ टक्के | दुप्पट |
उपलब्ध स्फुरद (पीपीएम) | १५० | २१ | ८ | दहापट |
उपलब्ध पालाश (पीपीएम ) | ३५८ | ३२ | २७ | बारापट |
उपलब्धमॅग्नेशिम (पीपीएम) | ४९२ | १६२ | ६९ | चौपट |
उपलब्ध कॅल्शियम (पीपीएम) | २७९३ | ९९३ | ४८१ | चौपट |
उपलब्ध पीएच | ७ | ६.४ | ६.१ | — |
गांडूळखत व कंपोस्ट / शेणखत यातील फरक
अ.क्र. | गांडूळ खत | शेणखत / कंपोस्ट खत |
१ | गांडूळखतलवकरतयारहोते (गांडूळेगादीवाफयावरस्थिरावल्यावर२–३आठवडे) | मंद गतीने तयार होते (जवळजवळ ४ महिने लागतात) |
२ | घाणवास, माशा, डास यांचा उपद्रवनसून आरोग्याला अपाय कारक नाही | घाणवास, माशा, डास यांपासून उपद्रव संभवतो |
३ | जागाकमीलागते | जागा जास्त लागते |
४ | ४ x १ x ७५ फूट आकाराच्या गादी वाफयापासून ( म्हणजेच ३०० घनफूट ) दर पंधरा दिवसाला ३टन खत मिळते | ३ x १० x १० फूट आकाराच्या खड्डयापासून दर महिन्यांनी १० टन खते मिळते. |
५ | उर्जा, गांडूळखत, द्रवरुपखत | कंपोस्ट व्यतिरिक्त इतर पदार्थ मिळत नाहीत. |
६ | हेक्टरी मात्रा ५ टन लागते | हेक्टरी मात्रा १२.५० टन लागते |
७ | तापमान फार वाढत नसल्यामुळे जिवाणूंचे कार्य जोमात होते. | तापमान वाढत असल्यामुळे जिवाणूंचे कार्य मंद असते. |
८ | नत्र उपलब्ध २.५ ते ३ टक्के | नत्र उपलब०.५ते१.५टक्के |
९ | स्फूरद उपलब्ध १.५ ते २ टक्के | स्फूरद उपलब्ध०.५ते०.९ टक्के |
१० | पालाश उपलब्ध १.५ ते २ टक्के | पालाश उपलब्ध १.२ते१.४ टक्के |
११ | सूक्ष्म अन्न द्रव्ये योग्य प्रमाणात उपलब्ध होतात | सूक्ष्म अन्न द्रव्ये कमी प्रमाणात उपलब्ध होतात |
१२ | गांडूळे विक्री करुन अतिरिक्त उत्पन्न मिळते | कोणतेही अतिरिक्त उत्पन्न मिळत नाही. |
गांडूळांचे व गांडूळ खता चे उपयोग
अ) माती च्या दृष्टिने
- गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो
- मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
- गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते.
- गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते.
- जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.
- जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
- बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
- जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो.
- गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
- 10.गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
- 11.जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत भरपूर वाढ होते.
ब) शेतकयांच्या दृष्टीने फायदे
- इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल.
- जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
- पाणी देण्याचा कालावधी कमी होतो
- झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते.
- रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत.
- मजूर वर्गावर होणारा खर्च कमी.
- गांडूळखत निर्मितीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलबध होते.
क) पर्यावरणाच्या दृष्टीने फायदे
- माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदुषण कमी होते.
- जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते.
- पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते.
- रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते.
- कच-याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात.
ड) इतर उपयोग
- गांडूळापासून किंमती अमिनो ऍसिड्स, एंझाईमस् आणि मानवासाठी औषधे तयार करता येतात.
- पक्षी, कोंबडया, पाळी जनावरे, मासे यांना उत्तम प्रती खाद्य म्हणून गांडूळ वापरता येतात.
- आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होतो.
- पावडर, लिपस्टिक, मलमे यांसारखी किमती प्रसाधने तयार करण्यासाठी गांडूळांचा वापर केला जातो.
- परदेशात पिझाज, आमलेट, सॅलेड यासारख्या खाद्य वस्तूमध्ये प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी गांडूळांचा उपयोग करतात.
- गांडूळांच्या कोरडया पावडरमध्ये ६० ते ६५ टक्के प्रथिने असतात. तिचा अन्नात वापर करता येतो.
गांडूळांच्या संवर्धनासाठी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी
- एक चौरस मीटर जागेत जास्तीत जास्त २००० गांडूळे असावीत.
- बेडूक, उंदीर, घूस, मुंग्या, गोम या शत्रुंपासून गांडूळाचे संरक्षण करावे.
- संवर्धक खोलीतील, खोक्यातील अथवा वाफ्यातील तापमान २० अंश ते ३० अंश सेंटिग्रेडच्या दरम्यान ठेवावे. गादीवाफ्यावर सरळ सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
- गादीवाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वाफ्यातील ओलावा ४० ते ४५ टक्के ठेवावा.
- गांडूळे हाताळतांना किंवा गांडूळ खत वेगळे करताना त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. इजा झालेली गांडूळे वेगळी करावीत, जेणेकरुन इतर गांडूळांना संसर्गजन्य रोग होणार नाही.
उत्तम प्रतीचे गांडूळ खत मिळण्यासाठी महत्वाच्या बाबी
- शेणखत, घोडयाची लीद, लेंडी खत , हरभ-याचा भुसा, गव्हाचा भुसा, भाजीपाल्याचे अवशेष, सर्व प्रकारची हिरवी पाने व शेतातील इतर वाया गेलेले पदार्थ हे गांडूळाचे महत्वाचे खाद्य होय.
- स्वयंपाकघरातील वाया गेलेले भाजीपाल्याचे अवशेष , वाळलेला पालपाचोळा व शेणखत समप्रमाणात मिसळले असता गांडूळाची संख्या वाढून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
- हरभ-याचा किंवा गव्हाचा भुसा शेणामध्ये ३:१० या प्रमाणात मिसळल्यास उत्तम गांडूळ खत तयार होते.
- गोबरगॅस स्लरी, प्रेसमड, शेण यांचा वापर केल्यास उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार होते.
गांडूळ खत वापरताना घ्यावयाची काळजी
- गांडूळ खताचा वापर केल्यानंतर रासायनिक खते कीट कनाशके किंवा तणनाशके जमिनीवर वापरु नयेत.
- गांडूळ शेतीत पिकांच्या मुळांभोवती चांगला ओलावा असणे गरजेचे आहे. तसेच तो वर्षातून ९ महिने टिकवणे आवश्यक आहे.गांडूळ आच्छादनरुपी सेंद्रीय पदार्थांचा वापर अन्न म्हणून करत असल्यामुळे त्या सेंद्रीय आच्छादनाचा पुरवठा वरचेवर करणे आवश्यक आहे.
- योग्य प्रमाणात ओलावा आणि आच्छादनाचा पुरवठा झाला नाही तर गांडूळांच्या कार्यक्षमतेते घट येते.
गांडूळ खतासाठी बेड निवडतांना काय काळजी घ्यावी ?
पारंपारिक पद्धतीने गांडूळ खत बनविण्यासाठी सिमेंटचा खड्डा बनविणे आणि मग त्यात खत बनविणे हे खर्चिक आणि वेळखाऊ होत होते. त्यासाठी पुढे बाजारात HDPE आणि इतर मटेरियल पासून बनलेले तयार व्हर्मीबेड उपलब्ध झाले जे सहज रित्या गांडूळ खत बनविण्यासाठी कामी येऊ शकतात. पण, ह्यातला कोणता बेड निवडायला पाहिजे ? चला तर पाहूयात –
१) व्हर्मीबेड हा आपल्या गरजेनुसार योग्य त्या साईझ मध्ये उपलब्ध असला पाहिजे.
२) तो योग्य जाडीचा आणि टिकाऊ मटेरियल पासून बनलेला असला पाहिजे.
३) शक्यतो त्याच्या कडा शिवलेल्या नकोत कारण दोऱ्याने शिवलेल्या कडा पाणी टाकल्यानंतर दोरा कुजून अलग होऊ शकतात व नुकसान होऊ शकते.
४) कडा प्लास्टिक वेल्डिंग तंत्राने वेल्ड केलेल्या असल्यास चांगल्या.
५) व्हर्मी बेड मधून व्हर्मीवॉश जमा करण्याची सुविधा असली पाहिजे. कारण व्हर्मीवॉश हे रोग प्रतिकारक तसेच वृद्धी संप्रेरक म्हणून काम करते.
६) वरील प्रमाणे बाजारात उपलब्ध असलेल्या व्हर्मीबेड मधून योग्य तो व्हर्मीबेड निवडावा.
गांडूळ खत बनविण्यासाठी गांडुळे सर्वत्र कशी उपलब्ध होतील ?
१) गांडूळ खतासाठी उत्तम प्रजातीची जसे कि – इओसिना फोटीडा, युड्रीलीस युजीनी आणि ऑस्ट्रेलीयन स्प्रिंग अर्थवर्म अशी गांडुळे निवडावीत.
२) देशी गांडुळे खत बनविण्यासाठी वापरू नयेत कारण ती जास्त माती खातात व सेंद्रिय पदार्थ कमी खातात. त्यामुळे खत उत्तम प्रतीचे बनत नाही.
३) त्याकरिता उपरोक्त सांगितलेल्या प्रजातीची गांडुळेच गांडूळ खत बनविण्यासाठी वापरावीत.
४) आता प्रश्न उरतो तो गांडूळ उपलब्ध कोठे होतील? तर कुठल्याही कृषी विज्ञान केंद्रात ती उपलब्ध होऊ शकतात किंवा मग गांडूळांच्या अंड्यांनी युक्त असे कल्चर उपलब्ध झाल्यास आपण गांडुळे आपल्या शेतावर उत्पादित करू शकतो.
वरील सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होते कि कुठल्याही सेंद्रिय खताच्या तुलनेत गांडूळ खत हे उत्तम असे सेंद्रिय खत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानो आपल्या शेतावर गांडूळ खताचा प्रकल्प जरूर उभारा आणि ते खत वापरून आपल्या शेतातील मातीला नवसंजीवनी द्या !
अधिक माहितीसाठी संपर्क करा 9284000511 ह्या क्रमांकावर
-
Product on sale1 WAY FOGGER THREADED 0.5″₹225.00
-
हिरा मल्चिंग पेपर ड्रिल₹500.00
-
Product on saleवर्मीबेड₹1,279.00 – ₹2,955.00
-
सिलपॉलीन प्लास्टिक ताडपत्री (Supreme Silpoulin)₹2.44 – ₹13.80
-
फॉगर₹150.00
-
मल्चिंग पेपर₹1,500.00
Leave a reply