शेती करीत असतांना आपण विविध हॉर्स पॉवर च्या मोटर्स वापरतो तसेच मोटरपासून पुढे शेतापर्यंत लांबवर पाणी पोहचविण्यासाठी आपण पाईपलाईन केलेली असते. हि एक मोठी खर्चाची बाब आहे. कधी कधी ह्या पाईपात पाण्याच्या प्रवाहासोबत घाण, काडी – कचरा, येतो व तो तिथे साचून राहतो, परिणामी शेतीमध्ये वापरले जाणारे पीव्हीसी पाईप पाण्याचे प्रेशर वाढल्यामुळे नेहमीच फुटत असतात. हे फुटण्यामागे कारणे वेगवेगळे असू शकतात. जसे कि
- जमिनीचा चढ, उतारामुळे पाण्याचा दबाव वाढणे.
- पाईपलाईनमध्ये बेंड किंवा एल्बो चा वापर केल्यामुळे.
- पाईपलाईन च्या डीझाईनमध्ये चुकी असणे.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव ( महाराष्ट्र ) ह्या गहन प्रश्नावर पर्याय सादर करीत आहे – पाण्याच्या प्रेशरमुळे पाईपलाईन फुटण्यापासून मुक्ती – हिरा प्रेशर रिलीफ व्हॉल्व.
काय आहे हिरा प्रेशर रिलीफ व्हाल्व ?
जिथे – जिथे शेतीकामात पाण्याचा प्रेशर खाली वापर केला जातो तिथे – तिथे हा व्हाल्व एक सेफ्टी व्हाल्व ( सुरक्षा झडप ) म्हणून काम करेल. हा व्हाल्व आपण घरात वापरत असलेल्या कुकर च्या शिट्टीप्रमाणे कार्य करतो. या व्हॉल्वमध्ये स्प्रिंगच्या सहाय्याने अशी रचना आहे कि पाईपलाईन मधील पाण्याचा दबाव ठराविक क्षमतेपेक्षा जास्त वाढत असेल तर हा व्हॉल्व उघडतो आणि पाणी पाईपलाईन मधून बाहेर फेकले जाते. ज्यामुळे पाईपलाईन फुटत नाही. हा व्हॉल्व सर्व प्रकारच्या पाईपलाईनसाठी काम करतो.
हिरा प्रेशर रिलीफ व्हाल्वची वैशिष्ट्ये :-
- २” च्या आतल्या / बाहेरच्या आट्यांच्या पाईपच्या कनेक्शन साठी उपलब्ध आहे.
- अॅल्युमिनीयम सारख्या उच्च दर्जाच्या धातूपासून बनल्यामुळे दुरुस्तीचा खर्च नाही लागत.
- अॅल्युमिनियम पासून बनलेले कवर ज्यामध्ये पाणी बाहेर निघण्यासाठी ११/२ ” ( दीड इंचाचा ) चा ड्रेन पोर्ट दिलेले दिलेला आहे.
- नारंगी रंगाची पावडर कोटिंग असल्या कारणाने तो गंजरोधक आहे आणि जास्त कालावधी पर्यंत कार्यरत राहतो.
- नारंगी रंग असल्यामुळे लांबून दिसायला मदत होते.
- बाहेरच्या चुडीदार आटेवाल्या प्रेशर रिलीफ वॉल्वला प्रेशर मिटर लावायला सुविधा उपलब्ध आहे.
- प्रेशर गेज चा उपयोग केल्याने गरजेप्रमाणे प्रेशर बदलता येऊ शकते.
तांत्रिक निर्देश
- प्रेशर रिलीफ सेटिंग: १.५ kg / cm2 से ५.५ kg / cm2 (20psi से 80psi)
- हा प्रेशर रिलीफ वॉल्व फॅक्टरी मार्फत ४ kg / cm2 ( 60 psi) वर अगोदरच सेट केलेला आहे.
- कसा वापरायचा ?
- PVC पाईपवर फिटिंग साठी सर्व्हिस सडल वर फिट करावा.
- HDPE किंवा स्पिंकलर पाईप वर फिटिंग साठी फुट बटम वर लावावा.
- GI पाईप फिटिंग साठी T चा वापर करून त्यावर फिट करावा.
- सर्व प्रकारच्या इरिगेशन प्रणाली जिथे पाण्याचा प्रेशरखाली वापर केला जातो जसे कि – रेनगन, रेनपाईप, स्प्रिंकलर, ड्रीप इत्यादी साठी अतिशय उपयुक्त.
Leave a reply