प्रकृतीत निसर्गतः सर्व जीवांचे संचरण व ज्याच्या त्याच्या सवयीप्रमाणे आचरण निरंतर सुरु आहे. शेती करीत असतांना जीवसृष्टीतल्या अनेक लहान मोठ्या जीवांशी आपला संबंध येत असतो. त्यात प्रामुख्याने शेतीपयोगी जनावरे जसे बैल, गायी इ.तसेच उपद्रवी कीटक, प्राणी यांचा समावेश आहे. सिंचनाचा विचार केला असता शेतात अंथरलेल्या ठिबक नळ्यांच्या जाळ्यास इजा पोहचविणारे उंदीर, खडीखाप, घुशी, ससे इ. प्राणी व पक्षी. सर्वसाधारणतः उंदीर व घुशी शेतातील ठिबक नळ्यांना इजा पोहचविन्यात अग्रेसर आहेत. चला या मागची कारणभिमांसा पडताळूयात.
आपला समज काय आहे या बद्दल ?
१) मूलतः उंदिराला कुरतडण्याची सवयच असते.
२) उंदरांचे दात वाढतात त्यांना दात घासण्यास कुठल्यातरी वस्तूची आवश्यकता असते.
३) साठवलेल्या गठ्ठ्यांमध्ये उंदरीन पिल्ले देते. पिल्ले दिल्यामुळे ते शेतातून जात नाही.
सत्य परिस्थिती काय ?
१) ठिबक सिंचन येण्याआधी अनेक वर्षांपासून उंदराचा वावर शेतांत आहे. आधीही कुरतडण्यासाठी त्याला बऱ्याच गोष्टी उपलब्ध होत्या आणि आजही आहेत. त्यामुळे तो फक्त ठिबकच्या नळ्याच कुरतडण्यासाठी शेतात येतो असे काही नाही. त्यामुळे त्याच्या कुरतडण्याच्या सवयीने फारसे असे नुकसान होत नाही.
२) पूर्वीही त्याचे दात वाढतच असतील आणि त्याचा शेतात वावर हि असेल. त्यामुळे आता तो शेतात असल्यावर ठिबकवरच हल्ला करेल असेही काही नाही. इतर कोणत्याही वस्तूंवर तो दात घासू शकतो. ह्यानेही तो नुकसानकारक ठरू शकत नाही.
३) तो ठिबकच्या साठविलेल्या गठ्ठ्यात पिले देतो असे म्हणणे असेल तर त्याला अडगळीची जागाच का उपलब्ध करून द्यायची जेणेकरून तो तिथे पिल्ले देईल.
मग ह्या मागच नेमक कारण काय?
हा उपद्रव मुख्यतः उन्हाळ्यात जास्त होतो. कारण इतर ऋतूत त्याला पिण्यासाठी भरपूर ठिकाणी पाणी उपलब्ध असते. उन्हाळ्यात पाण्याच्या तहानेमुळे तो कासावीस होऊन पाण्याच्या शोधात शेताकडे वळतो. ठिबक ड्रीपर्स मधून गळणारे पाणी दिसल्याने ते तिकड धाव घेतात. आणि ह्यामुळे मोठ्या नुकसानीची शक्यता आहे.
उपाय कोणते योजावे हे टाळण्यासाठी ?
१) ठिबकच्या नळीतून जेथून पाणी टपकत असेल अश्या ठिकाणाखाली १५-२० ठिकाणी बसकट भांडे बसवावे. जेणेकरून त्यात पाणी साचून भरल्यानंतर खालीही पडेल आणि उंदरास पाणी पिणे हि सोयीस्कर होईल. उंच भांडे ठेवल्यास त्यात जेंव्हा तो पाणी पिण्यास जाईल तेंव्हा भांडे तिरपे होऊन पाणी सांडेल व पाण्याचा अपव्यय होईल तसेच उंदीर त्यात पडण्याची शक्यता राहील.
२) पण हा उपाय एकट्या- दुकट्याने करण्यापेक्षा सामुहिक रित्या मोठ्या क्षेत्रावर केलेला जास्त फायदेशीर ठरेल कारण उंदीर हा फिरणारा प्राणी आहे.
३) बाजारात उंदीर प्रतिरोधक लॅटरल्स उपलब्ध आहेत पण त्यांचा वापर खर्चिक व बिगर फायद्याचा ठरेल. कारण, अश्या लॅटरल्समध्ये त्याला न आवडणारी चव अथवा वास घातलेला असतो. त्यामुळे कुरतडल्याशिवाय ह्याचा काही उपयोग नाही आणि कुरतडल्यावर नुकसान तर होणार आहेच. म्हणून हा पर्याय हि चुकीचा ठरेल.
४) गठ्ठे साठविताना अश्या ठिकाणी साठवावे जेथे माणसांचा वावर आहे. जेणेकरून घाबरून उंदीर येणार नाहीत. अडगळीच्या ठिकाणी शक्यतो गठ्ठे साठवू नये. साठवणुकीच्या ठिकाणी माउस ट्रॅप्स किंवा उंदीर पकडण्याचे पिंजरे वापरावेत.
५) साठवणुकीच्या ठिकाणी डांबरगोळ्या, गोमुत्र किंवा निंबोळी अर्क सारख्या वस्तू वापराव्यात. ज्यांच्या वासामुळे उंदीर येण्यास प्रतिबंध होईल.
-
Product on saleहिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक₹2,500.00 – ₹3,600.00
-
Heera Fertilizer Tank₹4,800.00 – ₹5,000.00
-
हिरा ईझी टू फिट₹3,800.00 – ₹4,500.00
-
हिरा फ्लेक्स पाईप₹3,200.00
-
हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी (10500 चे पॅकेज)₹8,835.00
-
कृषी पाईप₹720.00 – ₹900.00
-
हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल₹1,550.00 – ₹2,400.00
-
हिरा इनलाईन ठिबक₹1,250.00 – ₹1,850.00
-
हिरा नॅनो टाईनी ड्रीप₹750.00 – ₹950.00
4 comments on “उपद्रवी उंदीर आणि ठिबक सिंचन”
Prakash Satle
What is the remedy for rat,s at drip irrigation
Raghunath Jangid
sir please call 9307300137
Sunil kamble
I want for 6hect,16 mm please call me 9011194849 /9421758688
Gaurav Saindane
OUR SALES EXECUTIVES CALL YOU SOON SIR !!