इनलाईन ठिबक म्हणजे काय ?
इनलाईन ठिबक यंत्रणा म्हणजे असे ठिबक ज्यामध्ये ड्रिपर हे लॅटरलच्या आत लॅटरल तयार करतांनाच टाकले जाते.
ड्रिपरचे कार्य काय?
ड्रिपर्स/ इमिटर्स किंवा तोट्या हि सर्व नावे एकाच घटकाची आहेत.ड्रिपर हा ठिबक सिंचनामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. लॅटरलवर ठराविक अंतरावर झाडांच्या मुळाच्या कक्षेत ड्रिपर्स बसविले जातात.ड्रिपरमधून कमी दाबाने थेंबा – थेंबाने पाणी बाहेर टाकले जाते. सर्व ड्रिपर्स लॅटरलच्या एका बाजूस लावून त्यांची तोंडे / छिद्रे जमिनीच्या वर ठेवतात.ड्रिपर्स मध्ये उलट्या दिशेने मातीचे कण जाणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. याकरिता सबमेन वर एअर रिलीज व्हॉल्व्ह बसवावा.
हिरा इनलाईन टर्बोड्रिपर –
- हिरा इनलाईन टर्बो ड्रिपर हे व्हर्जिन ( उच्चतम दर्जाच्या ) प्लास्टिक पासून बनवलेले दीर्घायुषी ड्रिपर्स आहेत
- हिरा इनलाईन टर्बो ड्रिपर ची मुख्य विशेषता म्हणजे हे ड्रिपर साधारण ड्रिपरपेक्षा जास्त प्रभावशाली आहे.
- हिरा इनलाईन टर्बो ड्रिपर हे विशिष्ट प्रकारच्या हायड्रो टर्बो डिझाईनचे बनलेले आहे.
- हिरा इनलाईन टर्बो ड्रिपरच्या पृष्ठभागावर झिग – झॅग पद्धतीच्या अडथळेयुक्त खाचा पाडलेल्या आहेत. हिरा इनलाईन टर्बो ड्रिपरच्या ह्या खाचांमधून जेंव्हा पाणी पुढे जाते तेंव्हा पाण्यातील केर – कचरा, शेवाळ, बारीक कण ह्या खाचांमध्ये अडकून स्वच्छ पाणी झाडांना दिले जाते.
- हिरा इनलाईन टर्बो ड्रिपरच्या या वैशिष्ट्यामुळे ठिबक फारच कमी प्रमाणात चोक – अप होते.
- हिरा इनलाईन टर्बो ड्रिपरवर शैवाल प्रतिबंधक कोटिंग सुद्धा केलेली आहे.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव( महाराष्ट्र) हि सिंचन आणि कृषी उपकरणे क्षेत्रात नावाजलेली कंपनी असून आमची उत्पादने देशभर अनेक शेतकरी समाधानाने वापरीत आहेत. आपणासही जे हिरा ठिबक खरेदी करवयाचे असेल तर आजच संपर्क करा आमच्या वेबसाईटला खालील लिंकवर –
2 comments on “हिरा इनलाईन ठिबक मधील ड्रिपर – टर्बो ड्रिपर”
Valmik pawar
Rate of 16mm inline
Gaurav Saindane
FOR MORE IFORMATION PLEASE CALL ON 9284000518/513/514