शेतीसाठी उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करणे फार महत्वाची बाब आहे. योग्य पद्धतीची आणि कमी खर्चिक सिंचन पद्धती निवडली तर आपले सिंचन हि व्यवस्थित होते आणि आपला वेळ व पैसा सुद्धा वाचतो. आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका सिंचन पद्धती विषयी जी कमी खर्चात प्रभावशाली पद्धतीने सिंचन करते, इस्त्रायली तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक तुषार सिंचन प्रणाली – रेनगन सिंचन प्रणाली
आजपर्यंत रेनगन हा शब्द बऱ्याच वेळेस आपल्या ऐकण्यात आला असेल.पण बऱ्याच अंशी अनेक कंपन्यांच्या रेनगन यशस्वी झाल्या नाहीत. परंतु, आज रोजी संपूर्ण भारतभरच्या शेतकऱ्यांनी पसंद केलेली आणि सर्वाधिक यशस्वी अशी रेनगन आहे हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव ( महाराष्ट्र ) हयांची – हिरा रेनगन !
चला तर मग अधिक जाणून घेऊ हिरा रेनगन विषयी –
रेनगन इरिगेशन म्हणजे काय ?
स्प्रिंकलर / तुषार सिंचन प्रणालीतील अतिआधुनिक प्रकार म्हणजे पिकांना वर्तुळाकार पावसासारखे फवारून पाणी देण्यासाठी विकसित केलेली तुषार सिंचन पद्धती- हिरा रेनगन .
रेनगन पद्धतीची वैशिष्ठ्ये :-
१) पिकांवर फवारले जाणारे पाणी अगदी श्रावणसरीसारखे रीमझिम पडते.
२) जमिनीचा प्रकार, निचरा क्षेत्र यानुसार कमी जास्त प्रवाहाचे नोझल्स बसविता येतात.
३) रेनगन डोंगराळ, चढ-उताराच्या जमिनी, ओलितासाठी सहज वापरता येते.
४) पानावर पाण्याची फवारणी होत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून व किडींपासून संरक्षण मिळते.
५) अति उन्हात व कोरड्या हवामानात फवारा पद्धतीमुळे बागेतील तापमान कमी राहून आद्रता वाढते व त्यामुळे झाडांची वाढ चांगली होते.
६) वालुकामय जमिनीमध्ये पाण्याची आडवी ओल निर्माण करणे अवघड असते. अश्या वालुकामय जमिनीत ओलावा निर्माण करण्यासाठी रेनगन फायदेशीर आहे.
७) पाण्याचा फवारा पावसाच्या पाण्याप्रमाणे होत असल्यामुळे हवेतील अन्नघटक पाण्यात मिसळून द्रवरुपात पिकाला मिळतात.
८) विद्राव्य खतांचा वापर केल्यास फोलीअर स्प्रे प्रमाणे अन्नघटक पिकास मिळतात.
९) रेनगनचे पाणी पावसासारखे पडत असल्याने पिकांच्या पानावरील धूळ स्वच्छ होऊन प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो. त्यामुळे अन्नद्रव्ये तयार करण्यास मदत होऊन झाडांची वाढ चांगली होते व उत्पादन वाढते.
रेनगन कुठल्या पिकांसाठी उपयोगी पडते ?
ऊस, कपाशी, केळी, मका, गहू, भुईमूग, हरभरा, सोयाबीन, भाजीपाला, कांदा, बटाटे, चहा, कॉफी बागा, लॉनचे मैदान, खेळाचे मैदान, गोल्फ कोर्स, ग्रीनहाउस, नर्सरी यामध्ये रेन गन वापरू शकतात.
रेनगन इरिगेशन सिस्टीम शेतात कशी उभारावी ?
अ) रेनगन इरिगेशन सिस्टीम उभारणी साठी आवश्यक निकष / सामग्री :-
१) मोटार चा किमान Hp:- 3 Hp
२) पाण्याचा आवश्यक दाब :- 2.5 कि.ग्र / स्क्वे.से.मी वर रेनगन काम करण्यास सुरुवात करते पण चांगल्या परिणामासाठी पाण्याचा दाब 4 कि.ग्र / स्क्वे.से.मी असावा.
३) पाईप :- आपण रेनगन GI, स्प्रिंकलर पाईप किंवा PVC पाईप पैकी कोणत्याही पाईपवर उभारू शकतो. आता विशिष्ठ पद्धतीच्या फ्लेक्झीबल पाईप वर सुद्धा तुम्ही रेनगन चालवू शकता फक्त त्या साठी आवश्यक जोडण्या घ्याव्या लागतात.
४) सर्व्हिस सॅडल :- PVC पाईपवर रेनगन उभारण्यासाठी उपयोगी.
५) फुट बॉटम :- स्प्रिंकलर पाईपवर रेनगन उभारण्यासाठी उपयोगी.
६) प्रेशर मीटर :- पाण्याचा आवश्यक दाब मिळतो आहे किंवा नाही हे समजण्यासाठी उपयोगी.
७) प्रेशर रिलीफ व्हाल्व :- पाण्याच्या अति दबावामुळे कधी – कधी पाईपलाईन फुटण्याची शक्यता असते तेंव्हा यंत्रणेत प्रेशर रिलीफ व्हाल्व हा व्हाल्व लावलेला असल्यास हा धोका टाळता येतो.
८) ट्रायपॉड स्टॅण्ड :- तीन पायाचे पक्के GI पासून बनलेले, ओल्या मातीत स्टॅण्ड धसणार नाही असे ट्रायपॉड स्टॅण्ड घ्यावे.
ब) रेनगन इरिगेशन सिस्टीम उभारणी :-
१) सर्व प्रथम आपण वापरत असलेल्या पाईप च्या प्रकारावर रेनगन उभारणीसाठी आवश्यक त्या जोडणीचे साहित्य घ्या.
२) जोडणीच्या साहित्यात रेनगन प्रकारानुसार ( १.२५ ’’ किंवा १.५०’’ ) तोंड दिलेले असते तसेच पाईप बसविण्यासाठी देखील एक तोंड दिलेले असते. त्या मधील वरच्या बाजूच्या तोंडावर रेनगनचे ट्रायपॉड स्टॅण्ड बसवा.
३) ट्रायपॉड स्टॅण्डवर एक बाजूस प्रेशर मीटर बसविण्यासाठी जागा दिलेली आहे तिथे पाण्याचा आवश्यक दाब मिळतो आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेशर मीटर बसवा.
४) ट्रायपॉड स्टॅण्डवर वरचे बाजूस आतील आटे असणारी रेनगन बसवा.
५) एका बाजूचे क्षेत्र ओले करून घ्यावयाचे असल्यास रेनगनला 0 – 360 डिग्री कोनात गोलाकार फिरविण्यासाठी जी लॉक अॅरेंजमेंट दिलेली आहे तिचा उपयोग करून आवश्यक दिशेत रेनगन लॉक करून घ्या.
६) स्पिंकलर प्रणालीत उचल साचल करण्याची मुभा असते त्यामुळे आपण रेनगनचा उपयोग खालील प्रकारे करू शकतो.
क) रेनगन चालवण्यासाठी लागणारे पंप :-
रेनगन ला 2.5 किलो / सें.मी. दबावावर चालवण्यासाठी 3 हॉर्स पॉवरच्या किमान १२० हेडच्या पंपाची गरज असते. तथापि, शेतीचे क्षेत्रफळ , पाईप लाईनची लांबी, खोल विहीर , रेनगन ची नोजल साईज ह्या सगळ्या बाबींमुळे गरजेनुसार पंपाची निवड करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्या.
ड) रेनगन वापरतांना घ्यावयाची काळजी :-
१) रेनगन आणि ट्रायपॉड स्टॅण्ड एका जागेवरून दुसरीकडे नेत असतांना गन एखाद्या टणक जागेवर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
२) रेनगनला तेल किंवा ऑईल लावू नये. त्यामुळे रेनगनच्या कार्यामध्ये अडथळा होऊ शकतो.
३) रेनगनचे नोझल कुठल्याही खडबडीत वस्तूने साफ करू नये.
४) ओलित संपल्यानंतर रेनगन काढून स्वच्छ करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
५) रेनगन सुरु करण्यापूर्वी पाईपलाईन फ्लश करून घ्यावी.
६) ट्रायपॉड स्टॅण्डची उभारणी अचूक झाली आहे ह्याची काळजी घ्यावी.
हिरा रेनगन चे फायदे:-
१) एकाच जागेवरून अर्धा ते एक एकर मध्ये पाण्याचा दबावानुसार ७-८ नोझल वापरण्याऐवजी एकच रेनगन वापरून तुषार सिंचन करता येते. छोटे-छोटे स्प्रिंकलर वापरल्याने एका सिंचना नंतर ५० फूट पाईपलाईन सरकवावी लागत होती पण रेनगन द्वारे १५०-१७० फूट पर्यंत आपण पुढे सरकू शकतो. त्यामुळे वेळ आणि श्रमासोबतच विजेचीही बचत होते. हिरा रेनगन २११ लिटर प्रती मिनिट पाणी फवारते.
२) एक नवीन आधुनिक सिंचन पध्दत त्याच बरोबर वजनात हलकी आणी हाताळण्यासही सोपी जाते.
३) वेळेवर शेती सिंचन करण्यासाठी अतिशय उपयुक्त पडते. पेरणी करण्याआधी रेनगन द्वारे हलकेसे पाणी फवारल्याने अनावश्यक गवत / तण निर्माण होत नाही.
४) उन्हाळात रेनगन द्वारे पाणी फवारल्याने कमीतकमी पाण्याच्या उपयोग केला जातो, कमी वेळात लागवण केली जाते.
५) हिरा रेनगन द्वारे फवारणी केल्याने पिकाची पाने नीट धोतली जातात त्यामुळे किटकाचा प्रभाव कमी होतो तसेच पिंकामध्ये अन्ननिर्मितीची प्रकिया चांगल्या प्रकारे होऊन पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होते.
६) चढ-उतार असलेल्या जागे वर रेनगन द्वारे एकसमान सिंचन केले जाते.
७) हिरा रेनगन ने नियंत्रित सिंचन होत असल्यामुळे नाजूक पिंकाना नुकसान पोहचत नाही.
८) साधारणतः २ तास रेनगन चालवण्याने १.२ इंच जमीन ओलसर होईल इतका पावसासारखा फवारा होतो . इतका ओलसरपणा शेतजमीनीला पुरेसा असतो.
९) हिरा रेनगनला एक विशिष्ठ प्रकारचा अॅडाप्टर असल्याने कोणत्याही प्रकारच्या स्प्रिंकलर पाईपला आपण ती जोडू शकतो.
१०) हिरा रेनगन ची देखभाल अत्यंत कमी खर्चात होते. पूर्णपणे भारतीय बनावटीची असल्यामुळे सर्व प्रकारचे पार्टस उपलब्ध होतात आणी पूर्णपणे गॅरंटी सोबतच विकली जाते.
Leave a reply