महाराष्ट्रातील जवळजवळ ८० ते ८५% शेती मोसमी पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी केवळ १६.४% क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. महाराष्ट्रात जलसिंचनाचे प्रामुख्याने कालवे, तळी, सरोवर, पाझर तलाव -विहीरी, उपसा सिंचन, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, कुपनलिका असे प्रकार पडतात. ठिबक सिंचनात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य असून संपूर्ण भारताच्या ६०% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते. २००६-०७ मध्ये सिंचनाखालील एकूण क्षेत्र हे ३९.५८ लाख हेक्टर होते. पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी १७.५% क्षेत्र सिंचनाखाली होते.
ठिबक सिंचन योजनेमुळे तोट्यात असलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यन्वित झाल्या. ठिबकच्या वापराने उत्पन्नात वाढ तर होतेच शिवाय आंतरमशागतीचा खर्च कमी होऊन पाण्यासोबत वीज बिलातही बचत झाली. परिणामी उसासारख्या शेतीला ठिबक सिंचन सुविधा उपयुक्त आहे.
जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्य-तेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्हा केळीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे आणि जवळपास सर्वच केळी उत्पादक शेतकरी सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरतात त्यामुळे जळगाव शहरात ठिबक-सिंचन, त्यास लागणारे इतर साहित्य , पाण्याचे पी.व्ही.सी इत्यादी उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत.
वरील विवेचनावरून असे म्हटले तर हरकत नाही कि “ जळगाव शहर हे महाराष्ट्रातील सिंचनाची पंढरी आहे ” ह्याच जळगाव शहरात भुसावळ रोड लगत, गोदावरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या मागे असलेल्या औद्योगिक वसाहतीत एम – सेक्टर मध्ये आहे – प्लास्टिक इंजिनीअरिंग मध्ये उच्च पदवी धारण केलेल्या व अनेक अनुभवांच्या आधारे सिंचन क्षेत्रात गगनभरारी घेतलेल्या श्री. गिरीश नंदू खडके ह्यांची ‘ हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज. ’
‘ हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ’ ही संपुर्ण महाराष्ट्रातील ठिबक सिंचन क्षेत्रातील उत्पादने बनवणारी व कृषि क्षेत्रात वापरली जाणारी आधुनिक शेतीची अवजारांचे विपणन करणारी एक नामांकित व अग्रेसर कंपनी आहे. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातही उत्कृष्ट काम करते. कृषि विपणन व्यवस्थेमधील मध्यस्थांची साखळी वगळून थेट ग्राहकांच्या हातात उत्पादने पोहचविण्यासाठी कंपनी सोशल मेडिया आणि ई – कॉमर्स ह्या आधुनिक माध्यमांचा वापर करीत आहे. उत्पादनांच्या विक्रीसह कृषि क्षेत्रातील नवनवीन घडामोडी, शासकीय योजना व उत्पादन तंत्रज्ञान ह्यांची माहिती कंपनी विनामूल्य अनेक शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोहचवून कृषि ज्ञान प्रसारात योगदान देत आहे. कंपनी महाराष्ट्रात आणि इतरत्र शेतकऱ्यांच्या व कृषि निविष्ठा विक्रेत्यांच्या मनात एक आदरणीय प्रतिष्ठा राखुन आहे. कंपनी ही प्रत्येक काम, बदल आणि नवीन कल सांभाळुन शेतक-यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करते. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजची स्थापना एका छोट्याश्या युनिटपासून सन २००३ मध्ये श्री नंदू खडके यांनी केली आणि मुंबई येथून प्लास्टिक इंजिनिअरींग मध्ये एम.ई चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता हा व्यवसाय श्री गिरीश नंदू खडके पुढे चालवत आहेत. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजची सध्याची उलाढाल रु. ५ कोटींपेक्षा जास्त होईल. कंपनीची सुरूवात एका लहानश्या भाड्याच्या जागेत एका एक्स्ट्रुजन लाइन सोबत करण्यात आली. आज रोजी अनेक आधुनिक यंत्रांसह आणि कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळासह हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ठिबक सिंचन संच व अॅक्सेसरीज बनवणारी सिंचन क्षेत्रातील तसेच कृषी अवजारे क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी म्हणून उदयास आलेली आहे.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजची नावाजलेली उत्पादने :-
१) हिरा ठिबक सिंचन संच व अॅक्सेसरीज
२) हिरा तुषार सिंचन संच व अॅक्सेसरीज
३) हिरा रेनगन
४) हिरा रेनपाईप
५) हिरा सुपर व्हेन्च्युरी
६) हिरा हस्तचलीत व बॅटरीचलीत, 2 इन 1 व डबल मोटर स्प्रे पंप्स
७) हिरा सँड, डिस्क, स्क्रीन आणि सेमी ऑटोमॅटीक फिल्टर्स
८) हिरा ब्रश कटर
९) हिरा व्हर्मिबेड
१०) हिरा मल्चिंग पेपर
११) हिरा पी.व्ही.सी पाईप
१२) हिरा फॉगर
१३) हिरा कृषीपाईप
१३) सिंचनासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हॉल्व्ज – एयर रिलीफ व्हॉल्व, प्रेशर रिलीफ व्हॉल्व, फ्लश व्हॉल्व, बॉल व्हॉल्व इत्यादी.
2 comments on “सिंचन पंढरी ‘जळगाव’ आणि सिंचन क्षेत्रात अग्रणी हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव”
Avinash Shendge
I have required drip system for sugarcane. Lenth of plot is 200 fit & width is 200 fit.please send us details price.
Raghunath Jangid
Sir, We request you to please call on 9307300138