सिंचनासाठी योग्य पंपाची निवड कशी करायची ?
अनियमित आणि अपुर्या पावसामुळे जमिनीखालील पाण्याचा शेतीसाठी वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यासाठी प्रामुख्याने पंपांचा वापर केला जातो. शेतीपंपाची निवड करताना विहीर अथवा बोअरमधील पाण्याची पातळी, पाणी उपसण्याचे अंतर, पंपाचा प्रकार या गोष्टींसोबत पीक कोणते घ्यायचे, पिकाला पाणी किती आणि कसे द्यायचे याचाही विचार करणे गरजेचे ठरते. त्यानुसार पंप व मोटार निवडावी लागते. बर्याचदा पंप निर्माते माहिती पत्रकात याबाबत योग्य मार्गदर्शन करतात. कमी अथवा जास्त क्षमतेचा पंप, मोटारची निवड कार्यक्षमतेस मारक ठरते. पंप निवडीपूर्वी पंप गुणधर्मांचा अभ्यास करून सेंट्रीफ्युगल, जेट, सबसर्सिबल या मुख्य प्रकारातील योग्य पंप जाणकारांच्या सल्ल्याने निवडावा. पंपाची आवश्यक गती, पाणी उपसण्याची खोली/उंची, त्यात येणारी घर्षणजन्य तूट यांच्या माहितीआधारे पंप व त्याच्या स्टेजेस त्याची क्षमता ठरवतात. पंपाबरोबरच फूट व्हॉल्व्ह, चेक व्हॉल्व्ह, गास्केट, फ्लॅक व्हॉल्व्ह इन्स्पेक्शन प्लेट इ. गोष्टी लागतात. या प्रत्येकाची कामगिरी एकूण पंपाच्या कार्यक्षमतेवर परिणामकारक ठरते. पंपासाठी योग्य क्षमतेच्या मोटारीच निवडाव्या.
बहुतांश शेतकरी आजकाल पाण्याच्या उपस्यासाठी पाणबुडी मोटार किंवा सबमर्सिबल मोटार वापरतात. ह्या पंपाची निवड वरीलप्रमाणे सांगितल्यानुसार किती खोलीवरून पाणी उचलायचे आहे ( सक्शन ) आणि किती दूरपर्यंत पाणी पोहोचवायचे आहे ( डिलेव्हरी ) ह्यावर अवलंबून असते. थोडक्यात ह्याचे गणित करतांना ‘मोटारीचा हेड’ हा शब्द प्रामुख्याने वापरतात. ह्याच हेड च्या गणितानुसार मोटारीची क्षमता ठरते आणि निवड केली जाते.
पावसाळा आणि पाण्याची पातळी
पावसाळ्यात आपण मोटारीची निवड करतांना ग्राह्य धरलेली पाण्याची पातळी आणि पाऊस पडल्यानंतरची विहीर किंवा कूप नलिकेची पाण्याची पातळी ह्यामध्ये फरक पडतो. थोडक्यात पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे हे हेडचे गणित चुकते. ह्याच मोटारीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
हेडचे गणित कसे चुकते ? तर पावसाळ्या पूर्वी पाण्याची पातळी खोल असतांना आपण मोटार त्यानुसार खोलवर टाकलेली असते परंतु पाऊस पडून गेल्यावर हि पाण्याची पातळी वाढते परिणामी आपण जास्त हेडची घेतलेली मोटार काम करीत नाही आणि ती तिच्या शक्ती पेक्षा जास्त काम करू शकत नसल्याने खराब होते किंवा जळते.
हेड चे गणित
सर्वप्रथम हेड म्हणजे काय ते लक्षात घेऊ. पाण्याच्या दाबाच्या तुलनेत मोटार किती उंचीपर्यंत पाणी पोहोचवू शकते ती उंची म्हणजे हेड. उदाहरणार्थ काही मोटारीचे हेड जसे कि सेन्ट्रिफ्युगल मोटारी 1000 मीटर एवढे अधिक असते. ह्याचाच अर्थ ह्या मोटारी 1000 मीटर उंचीपर्यंत पाणी उपसु शकतात.
पावसाळ्यातच ह्या मोटारी का जळतात?
समजा आपल्या विहिरीतील पाण्याची पातळी २०० मीटर खोल आहे त्यानुसार हेड च गणित ठरवून आपण मोटार बसवलेली आहे. पावसाळ्यात हि पाण्याची पातळी वाढते समजा ५० मीटर वाढली तर हेड ५० मीटर ने कमी होणार. पण, आपण २०० मीटर चा हेड गृहीत धरून मोटार सेट केलेली असते. परिणामी मोटार तिच्या कार्यक्षमते नुसार काम करीत नाही व तिच्यावर लोड येतो. ह्यामुळे मोटार खराब होते आणि जळते.
हेड गरजेपेक्षा जास्त झाल्यास किंवा कमी झाल्यास मोटारवर लोड येऊन ती जळते. ह्या साठी हेड च गणित लक्षात घेऊनच मग मोटार तशी कमी / जास्त Hp ची मोटार घ्यावी.
Leave a reply