शेतकरी बांधव मोठा खर्च करून ड्रिप इरिगेशन लावतात आणि त्यात जर ती कुठल्या कारणाने बंद पडली तर फार नुकसान होते. म्हणजेच जर ड्रिप चोक अप झाली तर फार मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. बरेच जण ड्रिप चोक झाली कि कशी साफ करायची किंवा चोक अप कसे काढायचे याचे सल्ले देतात. पण, जर आपण ड्रिप चोक अप का होते ? ह्याचाच जर अभ्यास केला तर आपले नुकसान बऱ्यापैकी टळू शकते.
ड्रिप चोक अप होते म्हणजे काय होते ?
इनलाईन ड्रिप मध्ये ड्रिपर्स आतून लावलेले असतात. ह्या ड्रिपर वर झिगझॅग आकाराची रचना केलेली असते ज्यातून पाणी वाहत जाऊन छिद्रावाटे बाहेर थेंब-थेंब पडते. जर कुठल्या प्रकारचा कचरा किंवा घाण ह्या झिगझॅग रचनेत अडकला तर पाण्याचा मार्ग खुंटतो आणि पाणी पुढे जात नाही परिणामी ड्रिप बंद होते ह्यालाच ड्रिप चोक – अप झाली असे म्हणतात.
लोकांचा गैरसमज –
१) ड्रिपर ठोकल्याने ड्रिप चोक अप निघू शकतो. अहो पण एका एकरात जर हजारो ड्रिपर असतील तर प्रत्येक ड्रिपर आपण ठोकत बसणार का ?
२) बरेच जण सांगतात अमुक वापरल्याने चोक अप निघते. पण मुळात खरे हे आहे कि १००% ड्रिप चोक अप कधीच दुरुस्त होत नाही.
मग अशा परिस्थतीत काय करायचे ? तर शहाणपणा ह्यातच आहे कि ड्रिप चोक अप होऊच द्यायची नाही. त्यासाठी आपल्याला ड्रिप चोक अप का होते ? ह्या संबंधी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग हि माहिती घेवू या –
का होते ड्रिप चोक – अप ?
१) प्रत्येक कंपनी एका ठराविक प्रेशर रेटिंग वर ड्रिप बनवीत असते आपण जर त्या पेक्षा कमी पाण्याच्या प्रेशरवर ड्रीप चालविली तर ती चालणार नाही चोक अप होण्याची संभावना वाढेल.
२) पाण्याच्या स्त्रोतानुसार पाण्यात काही प्रमाणात कचरा – घाण येत असते हि घाण ड्रिपर वरील खाचांत अडकून पाणी पुढे जाऊ देत नाही आणि ड्रीप चोक अप होते. अशी घाण पाण्यासोबत ड्रिपमध्ये जाऊ नये ह्यासाठी फिल्टर वापरणे अत्यंत गरजेचे आहे.
३) फिल्टर लावला पण तो योग्य प्रकारचा न लावल्याने ड्रिप चोक – अप होते.
४) फिल्टर लावला पण तो वेळोवेळी साफ केला नाही तर कचरा – घाण पाण्यासोबत ड्रिपमध्ये जाऊन ड्रिप चोक अप होते. दिवसातून दोनदा फिल्टर साफ केलेच पाहिजे.
५) मोठे क्षेत्र असल्यास क्षेत्राला एक – एक एकराच्या तुकड्यात विभागून कॉक सिस्टीम लावून ड्रिप चालविली पाहिजे पण असे न करता ड्रिप चालविल्यास दबाव कमी झाल्याने चोक अप होऊ शकते. तसेच निर्देशानुसार लांबी न अंथरता जास्त लांबीवर ड्रिप अंथरल्यास दबाव कमी होऊन ड्रिप चोक अप होऊ शकते.
६) व्हेंच्युरी किंवा फर्टीलायझर टँक च्या माध्यमातून जेंव्हा आपण ड्रिपद्वारे खते देतो तेंव्हा खते दिल्यानंतर ड्रिप साफ होण्यासाठी त्यातून पाणी दिले पाहिजे. पण, होते नेमके उलटेच लोक खते दिल्यानंतर काही काळ ड्रिप बंद ठेवतात परिणामी पाण्याचे बाष्पीभवन होऊन खतांचे अंश घन स्वरुपात ड्रिपमध्ये साचतात आणि ड्रिप चोक अप होते.
हिरा ॲग्रो इंडस्ट्रीज, जळगाव ( महाराष्ट्र ) सिंचन आणि कृषी उपकरणे क्षेत्रात नावाजलेली एक कंपनी आहे. आमची दर्जेदार उत्पादने आमचे ग्राहक संपूर्ण भारतभर समाधानाने वापरीत आहेत. आमची गुणवत्तापूर्ण ठिबक खरेदी करण्यासाठी आजच आमच्या वेबसाईटला संपर्क करा www.heeraagro.com
One comment on “ड्रिप इरिगेशन चोक अप का होते ?”
Ghadge
छान माहिती दिलीत