ठिबक सिंचन वापरतांना शेतकऱ्यांचा पाण्याचा स्त्रोत वेगवेगळा असतो आणि त्या प्रमाणे पाण्यात मिसळून येणारी घाण / अशुद्धी ज्यामुळे ठिबक चोकप होऊन काम करणे बंद होऊ शकते. ह्यासाठी आपण पाणी शुद्ध स्वरूपात ठिबक यंत्रणेला पोहोचविण्यासाठी फिल्टर्स वापरतो. बरेचसे शेतकरी फिल्टर बसवतच नाहीत, काही बसवितात पण अयोग्य प्रकारचे, तर बरेच फिल्टर नुसत बसवितात त्याला स्वच्छ करीत नाहीत. ठिबक सिंचन पद्धतीत फिल्टर्सला संचाचा आत्मा असे म्हटले जाते. दिलेल्या निर्देशांप्रमाणे हे फिल्टर्स वेळोवेळी साफ केले गेले पाहिजे म्हणजे आपली ठिबक सिंचन यंत्रणा व्यवस्थित कार्य करेल.
सर्वप्रथम आपण जाणून घेवू यात फिल्टर्सच्या कार्यपद्धतीविषयी-
फिल्टर्सची कार्यपद्धती
१) पाण्यात तरंगणारी सर्व प्रकारची घाण हि मोठ्या प्रमाणात पाण्याबरोबर येते. त्यामुळे स्क्रिन फिल्टर वारंवार चोक अप होईल. म्हणून सँड फिल्टर वापरण्यात यावे.
२) मोठ्या प्रमाणात येणारी हि घाण सॅंड फिल्टर मध्ये जमा झाली की फिल्टर मधील कार्यक्षम व विशिष्ठ प्रकारे धार दिल्या गेलेली वाळू ( सँड ) ह्या घाणीचे छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतर करून पाणी आउटलेट द्वारे पुढे पाठविते. आता हि छोट्या छोट्या तुकड्यात रुपांतरीत झालेली घाण पाण्यासोबत पुढे जाण्याची शक्यता आहे म्हणून ती आडविण्यासाठी संचाच्या मांडणीमध्ये स्क्रिन फिल्टरची किंवा डिस्क फिल्टरची आवश्यकता आहे.
३) जेंव्हा पाण्याचा स्त्रोत नदी असतो किंवा नदीकाठच्या जमिनीतील विहीर / बोअर असतो. तेंव्हा रेतीचे बारीक कण ( रेताड ) मोठ्या प्रमाणात पाण्यासोबत येतात ज्यामुळे स्क्रिन फिल्टर थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने चोक अप होऊ शकते. अश्या परिस्थितीत शंकू फिल्टर कामास येईल. म्हणून संचाच्या मांडणीत शंकू फिल्टर व नंतर सेकंडरी फिल्टर असावा.
४) आकार शंकूसारखा म्हणून याला शंकू फिल्टर असे म्हणतात. यात एका खाली एक अश्या चकत्या असतात. पाणी इनलेट मधून आत येते व ह्या चकत्यांमधून वेगाने गोल-गोल फिरविले जाते. त्यामुळे पाण्यातील जड कण खालच्या बाजूस कलेक्शन टॅंकमध्ये जमा होतात व कणविरहीत पाणी आउटलेटद्वारे पुढे पाठविले जाते. कलेक्शन टॅंकला असलेल्या झडपेतून हे जमा झालेले वाळूचे कण काढता येतात. यात पाण्यासोबत शेवाळ आले तर तेही पाण्यासोबत बारीक तुकड्यांत पुढे जाईल म्हणून जोडणीत सेकंडरी फिल्टर लावणे जरुरी आहे.
५) फिल्टर्स नेहमी उच्च क्षमतेचेच लावावेत.म्हणजे आपली पाईप लाईन २ इंचाची असेल तर २.५ इंची फिल्टर लावावा म्हणजे पाणी अधिक चांगले स्वच्छ होऊन ठिबक संचास जाईल.
६) बऱ्याच वेळेस अशी शंका येते की फिल्टर्स मुळे पाण्याच्या दाबावर काही परिणाम होत असेल ? तर, सेकंडरी फिल्टरची जाळी चोक अप असल्यास मागील पाण्याचा दबाव वाढेल नाही तर पाणी पुढे जात राहील. अधून-मधून फिल्टरची जाळी साफ करीत जावी म्हणजे हा प्रश्न उद्भवणार नाही.
७) सँड फिल्टरमध्ये तीन वेगवेगळ्या आकारांची वाळू एकत्र स्वरुपात असते. ह्यात घाण जमा होऊन ते अकार्यक्षम होऊ नये यासाठी इनलेट, आउटलेट व बॅकफ्लश बंद करून फ्लश उघडावा व त्यातून वेगाने पाणी आत सोडावे त्यामुळे वाळूत अडकलेली घाण स्वच्छ होऊन फ्लशवाटे निघून जाईल. कालांतराने जास्त प्रमाणात घाण जमा झाल्यास फिल्टरवर दिलेले चार नट उघडून वाळू काढून घ्यावी आणि अॅसिडयुक्त पाण्याने धुवून परत फिल्टरमध्ये भरावी.
फिल्टर्सची देखभाल कशी करावी ?
अ) स्क्रीन फिल्टर (जाळीची गाळणी) ची स्वच्छता
ठिबक सिंचन पाण्याच्या गाळणीसाठी स्क्रीन फिल्टर वापरतात. सामन्यत: १२० मेश (०.१३ मिमी) आकाराच्या छिद्रांची जाळी वापरले जाते.
- प्रथमत: संच बंद करून स्क्रीन फिल्टर दाब विरहित करावे.
- फिल्टरचे बाहेरील आवरण खोलून फिल्टर ची जाळी वेगळी करावी व स्वच्छ पाण्याने साफ करावी.
- रबर सील जाळी पासून काढून आवश्यकता असल्यास नवीन बसवून सील व्यवस्थीत असल्याची खात्री करावी.
- फिल्टर च्या तळाशी असलेल्या व्हॉल्व्हचा उपयोग करून जाळी भोवतीची घाण काढून टाकावी.
ब) सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरची (वाळूची गाळणी) स्वच्छता
धरणे, नद्या, कालवे यांतील पाण्यातून येणारे शेवाळ, सेंद्रिय पदार्थ व कचरा वेगळा करण्यासाठी सँड/ ग्रॅव्हेल फिल्टरचा उपयोग होतो. ग्रॅव्हेल फिल्टरच्या अगोदर व पुढे असे २ दाबमापक यंत्रे (प्रेशर गेज) बसवलेले असतात. दाबमापक यंत्रातील पाण्याच्या दाबाचे १० टक्क्यापेक्षा जास्त पतन झाल्यास ग्रॅव्हेल फिल्टर साफ करावे, किंवा आठवड्यातून एकदा साफ करावे. याची स्वच्छता करताना बॅक फ्लशिंग (विरुध्द प्रवाह) तंत्राचा वापर करतात. याद्वारे पाण्याचा प्रवाह विरुध्द दिशेने करून फिल्टर साफ केले जाते ते खालीलप्रमाणे:
- सिंचनप्रणाली चालू असताना बायपास व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडा करून बॅक फ्लशिंग व्हॉल्व्ह पूर्णपणे चालू करावा.
- मुख्य कंट्रोल व्हॉल्व्ह व आऊटलेट व्हॉल्व्ह पूर्णपणे बंद करावा.
- फ्लशिंग करते वेळी बायपास व्हॉल्व्ह अंशत: बंद करून सिंचन प्रणालीचा दाब सामान्य दाबापेक्षा ३० टक्के अधिक वाढवावा.
- बॅक फ्लश व्हॉल्व्हमधून स्वच्छ पाणी येईपर्यंत पंप चालू ठेवावा. स्वच्छ पाणी आल्यानंतर पंप बंद करावा.
क) हायड्रोसायक्लोन फिल्टरची (शंकू फिल्टर ) स्वच्छता
या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातील वाळूचे कण वेगळे करण्यासाठी होतो. हा फिल्टर नरसाळ्याचा आकाराचा असतो, त्याचा निमुळता भाग तळाशी एका आडव्या टाकीला जोडलेला असतो.
- टाकी मध्ये पाण्यातून वेगळी काढलेली वाळू गोळा होते.
- टाकीला असलेला हॉल्व्ह उघडून जमा झालेली वाळू काढून टाकावी.
ड) डिस्क फिल्टरची ( चकतीचा फिल्टर ) स्वच्छता
या फिल्टरचा उपयोग सिंचनाच्या पाण्यातून घन कण काढून टाकण्यासाठी होतो.
- डिस्क फिल्टर उघडून सर्व चकत्या मोकळ्या कराव्यात व एका दोरीत बांधून घेऊन स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात.
- मोठ्या बादलीत १० टक्के तीव्रतेचे हायड्रोक्लोरिक अॅसिड अथवा हायड्रोजन परॉक्साईड च्या द्रावणात या चकत्या साधारणपणे अर्धा तास ते दोन तास बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
- सर्व चकत्या पूर्वी होत्या त्या स्थितीत ठेवून फिल्टर ची जोडणी करावी.
शेतीविषयक प्रतिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी हिरा ऍग्रोच्या युट्युब चॅनेलला एकदा नक्की भेट द्या.
-
Product on saleहिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक₹2,500.00 – ₹3,600.00
-
Heera Fertilizer Tank₹4,800.00 – ₹5,000.00
-
हिरा ईझी टू फिट₹3,800.00 – ₹4,500.00
-
हिरा फ्लेक्स पाईप₹3,200.00
-
हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी (10500 चे पॅकेज)₹8,835.00
-
सेमी ऑटोमेटीक डिस्क फिल्टर₹4,500.00 – ₹6,100.00
-
Product on saleहिरा डिस्क फिल्टर₹3,300.00 – ₹4,700.00
-
कृषी पाईप₹720.00 – ₹900.00
-
Product on saleप्लास्टिक स्क्रीन फिल्टर₹2,000.00 – ₹3,000.00
Leave a reply