व्हेन्चुरी म्हणजे काय ?
ठिबक सिंचनात पिकांच्या मुळाच्या कार्यक्षम कक्षेत खते देण्याच्या प्रक्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात. फर्टिगेशन करिता वापरल्या जाणाऱ्या उपकरणास व्हेन्चुरी असे म्हणतात. पाण्याच्या दबावातील फरकामुळे निर्माण होणाऱ्या व्हेक्युम तंत्रज्ञानावर हि व्हेन्चुरी कार्य करते.
व्हेन्चुरी द्वारे कोणत्या प्रकारची खते देता येतात ?
खते हि अनेक प्रकारची असतात जसे कि दाणेदार, लिक्विड, पावडर इत्यादी. हि सर्व प्रकारची खते व्हेन्चुरीद्वारे दिली जाऊ शकतात फक्त ती पाण्यात पूर्णपणे विरघळली पाहिजेत. जसे कि आपण पाण्यात जर मीठ क्निवा साखर टाकली तर काही वेळाने ते संपूर्णपणे पाण्यात विरघळून जातात व कुठलाच अवशेष शिल्लक राहत नाही . तसेच पाण्यात पूर्णपणे विरघळणारी खते आपण व्हेन्चुरी द्वारे देऊ शकतो.
संपूर्ण भारतभर दाणेदार आणि लिक्विड खते मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. हि खते पाण्यात सहज मिसळून जातात त्यामुळे ह्यांचा वापर आपण व्हेन्चुरी द्वारे करू शकतो. परंतु आजपर्यंत पाण्यात विरघळणारी पावडरयुक्त खते तयार नाहीत परंतु भविष्यात अशी खते तयार झाल्यास ती सुद्धा आपण व्हेन्चुरी द्वारे देऊ शकू.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव ( महाराष्ट्र ) हि सिंचन क्षेत्रातील नावाजलेली कंपनी असून कृषी विषयक अन्य जरुरी उपकरणे निर्मिती आणि विक्री च्या कामात गेली कित्येक वर्षे कार्यरत आहे. उच्चतम क्वालिटी आणि दर्जेदार हिरा व्हेन्चुरी खरेदी करण्यासाठी आजच आमच्या वेबसाईटला संपर्क करा www.heeraagro.com येथे.
Leave a reply