उपलब्ध पाण्याचा सुयोग्य व सुनियोजित वापर करण्यासाठी अस्तित्वात आली सूक्ष्म सिंचन पद्धती. सूक्ष्म सिंचन पद्धती मध्ये ड्रिप इरिगेशन आणि स्प्रिंकलर इरिगेशन ह्या पद्धतींचा समावेश होतो. स्प्रिंकलर म्हणजेच तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून आपण ३५ ते ५० % पर्यंत पाण्याची बचत करू शकतो . तुषार सिंचन पद्धतीमुळे पाणी पावसासारखे पिकांवर फवारले जात असल्याने पिकांमध्ये अन्न निर्मितीचा वेग वाढतो आणि उत्पन्न वाढते तसेच उत्पादनाचा दर्जाही सुधारतो.
साधारण स्प्रिंकलर हे पितळाचे बनलेले असतात त्यामुळे त्यांचा उभारणी खर्च हा जास्त येतो शिवाय धातूचे बनलेले असल्याने ते चोरी होण्याची शक्यता हि अधिक असते. तसेच निळ्या रंगाची जी मायक्रो स्प्रिंकलर वापरली जातात ती कमी अंतरावर फवारणी करतात त्यांच्या तुलनेत हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर अधिक क्षेत्र भिजवीते आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा करून देते.
चला अधिक जाणून घेवूयात हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर विषयी
- कमी खर्चात अधिक फायदा करून देणारी तुषार सिंचन प्रणाली.
- पारंपारिक मायक्रो स्प्रिंकलर ( Blue ) पेक्षा हिरा ऑरेंज स्प्रिंकलर वापरून जास्त क्षेत्र भिजविता येते आणि अधिका नफा मिळतो.
- कमीत कमी पाण्याच्या प्रेश्वर काम करणारी प्रभावी सिंचन प्रणाली. १.५ ते ३.० कि.ग्रॅ / से.मी2 पाण्याच्या दाबावर काम करते.
- हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर १८ x १८ फुटांवर लावता येतात. वास्तविकतः मायक्रो स्प्रिंकलर २८ फुटापर्यंत पाणी मारतात परंतु कोणतीही जागा कोरडी सुटू नये म्हणून व संपूर्ण क्षेत्र भिजविण्याच्या दृष्टीने त्यांना १८ फुटांवर लावणे योग्य.
- पारंपारिक निळे स्प्रिंकलर हे फक्त १० फुटांवर पाणी मारतात म्हणून ते एकरी ४०० नग लागतात त्यामुळे खर्च वाढतो. तर हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर आपण १८ ते २० फुट लावू शकतो म्हणून फक्त १३० नाग एकराला लागतात.
- एक तासाला १२० लीत पाणी फवारण्याची हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर ची क्षमता आहे.
- हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलरच्या नोझल ला एक विशिष्ट झडप दिलेली आहे. त्यामुळे जेंव्हा स्प्रिंकलरचे काम बंद असते तेंव्हा नोझल झडपमुले बंद होते व त्यात कुठली किडी शिरू शकत नाहीत. ह्या कारणांमुळे स्प्रिंकलरचे नोझल कमी चोकाप होतात.
- हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलरचा थेंब हा लहान असल्यामुळे पाणी पूर्णतः जमिनीत जिरविले जाते. ह्या शिवाय पाणी हलक्या फवाऱ्याच्या स्वरुपात पिकांवर पडत असल्याने पिके झोडपली जात नाहीत व पिकांचे नुकसान होत नाही.
- हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर १६ तसेच २० मि. मी. लॅटरल तसेच २५ व ३२ मि.मी
- लॅटरलवर बसविता येतात ( परंतु ह्यासाठी पाण्याचा स्त्रोत मोठा व प्रेशर थोडे जास्त असावे लागते. )
हिरा ऑरेंज स्प्रिंकलर आपण नर्सरी, ग्रीनहाउस, उद्याने इत्यादी ठिकाणी वापरू शकतो. भाजीपाला पिके व फुलशेतीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. कांदा पिकासाठी विशेष करून कांदा बीजोत्पादनासाठी हे फारच उपयोगी आहे.
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव सिंचन क्षेत्रातील एक नावाजलेली कंपनी आहे जी मायक्रो स्प्रिंकलर च्या निर्मिती व विक्री व्यवसायात अग्रेसर आहे.
हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर विषयी मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी खालील क्रमांकावर कॉल करा.
९२८४०००५११, ९२८४०००५१२, ९२८४०००५१३, ९२८४०००५१४, ९२८४०००५१५, ९३७०७२२७२२
हिरा ऑरेंज मायक्रो स्प्रिंकलर विषयी व्हिडिओद्वारे जाणून घेण्याकरिता खालील व्हिडीओ नक्की पहा.
Leave a reply