बऱ्याच वेळेस ड्रिप इरिगेशन संच खरेदी करतांना शेतकरी बांधवांना असे सांगितले जाते कि चार छिद्रे असणाऱ्या ड्रिपर्स मुळे ड्रिप चोकप होत नाही. हे खरे आहे का ? ह्याची वास्तविकता कधी आपण पडताळून पाहिली आहे का ? प्रस्तुत लेखातून आपण ह्याच गहन विषयावर प्रकाश टाकणार आहोत ‘ठिबक सिंचनात ड्रिपरला किती छिद्रे असली पाहिजेत?’
२ छिद्रे व ४ छिद्रे म्हणजे काय ?
पिकांच्या मुळांच्या कार्यक्षम कक्षेत मोजून – मापून थेंबा थेंबाने ड्रिपर्स च्या साह्याने पाणी देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन असे म्हणतात. ज्यावेळेस ठिबक सिंचन पद्धतीत ड्रिपर हे लॅटरल तयार करतांनाच लॅटरलच्या आत ठरविक अंतरावर टाकले जाते तेंव्हा तिला इनलाईन ठिबक पद्धत असे म्हणतात. कंपन्यांपरत्वे अश्या पद्धतीत ड्रिपर जेथे लावले जाते तिथे दोन किंवा चार छिद्रे पाणी बाहेर पडण्यासाठी दिली जातात.
आता ४ छिद्रे असणारी ड्रिप चोकप होत नाही असे जर म्हणणे आहे तर त्याची वास्तविकता आपण पडताळून पाहू. ह्यासाठी आपल्याला पहिले ड्रिप चोकप होते म्हणजे, नेमके काय होते ते अभ्यासले पाहिजे-
आपण ह्याआधी पाहिलेच कि इनलाईन ड्रिप इरिगेशन मध्ये ड्रिपर्स हि लॅटरल तयार करतांनाच लॅटरलच्या आत ठरविक अंतरावर टाकली जातात. हि ड्रिपर्स एका ठराविक आकाराची व डिझाईनची बनलेली असतात. ह्या ड्रिपर्स वर झिग झॅग पद्धतीने खाचा दिलेल्या असतात ज्यातून पाणी वाहत जाते व नंतर नळीवर दिलेल्या छिद्रावाटे बाहेर पडते. ह्या प्रकारच्या डिझाईन ला हायड्रो टर्बो डिझाईन असे म्हणतात.
आता ड्रिपर्स चोकप होतात म्हणजे नेमके काय होते ते एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ – आपण गावच्या मंदिरात दर्शनाला जातो तेंव्हा यात्रे व्यातिरिक्तच्या काळात आपणास सहज दर्शन होते कारण गर्दी कमी असते. परंतु, यात्रेच्या वेळेस गर्दीमुळे सहजासहजी दर्शन होत नाही. अश्या वेळेस आलेल्या भाविकांना सुरक्षितपणे व सहज दर्शन व्हावे म्हणून मंदिर प्रशासन व सुरक्षा प्रणाली अडथळे ( बॅरीकेट्स ) लावून रांगेने भाविकांना दर्शनासाठी सोडतात. ह्यामुळे एकेक जण पुढे जातो आणि प्रत्येकाला दर्शन सुलभतेने होते.
इनलाईन ठिबक पद्धतीत जे ड्रिपर वापरले जाते त्याचेही कार्य काहीसे असेच आहे. कुठलाही अडथळा आला तरी झाडांना नियोजनबद्ध पाणी मिळावे अशी ह्या ड्रिपरची डिझाईन केलेली असते. या वर झिगझॅग पद्धतीने खाचा पाडलेल्या असतात ज्यातून पाणी एका विशिष्ठ पद्धतीने फिरते जेणे करून त्यावरील खाचांमध्ये पाण्यातील घाण अडकून पाण्याचा प्रवाह अबाधित न होता ताशी ४ लिटर पाणी झाडांना बरोबर मिळते.
वरील उदाहरण व इनलाईन ड्रिपरची रचना समजल्यानंतर आता असे म्हणणे असेल की चार छिद्रे असल्यामुळे ठिबक चोक-अप होणार नाही किंवा कमी चोक-अप होईल. तर, मुख्य बाब हि आहे की छिद्रे चोक-अप होत नाहीत तर आतील ड्रिपरवरील खाचांमध्ये कमी अधिक प्रमाणात घाण किंवा चिखल-माती अडकल्याने चोक-अप होते. हि छिद्रे तर सुईने साफ करता येतील पण ड्रिपर आत फिट केलेले असल्याने त्याला आपण सुईने साफ करू शकत नाही व ती घाण तशीच राहते म्हणून चोक-अप होते. आता हे कसे घडते ते अभ्यासुयात.
दोन किंवा चार छिद्रे असू द्यात एकीकडून पाणी तर दुसरीकडून हवा निघेल. सिंचन पद्धतीत पाणी विहीर / बोअर अश्या स्त्रोतातून वर उचलले जाते आपल्या पाईपलाईनवर जोडणीत पाणी परत जाऊ नये म्हणून जोडणीत एक नॉन रिटर्न व्हाल्व बसविलेला असतो. जेंव्हा पाणी पुढे आणून जमिनीला दिले जाते जेथे जमिनीजवळ ड्रीपर लावलेला आहे अश्या ठिकाणी काही प्रमाणात जमीन ओली होऊन चिखल तयार होतो. काही तासांनंतर जेंव्हा मोटर बंद केली जाते काही पाणी विहिरीत परत जाते तेंव्हा कमी दाबामुळे हवेची पोकळी तयार होते. ठिबक संच हि संपूर्णतः closed system ( बंद प्रणाली ) असल्याने कमी दाबामुळे निर्माण झालेली हवेची पोकळी भरण्यासाठी जागा फक्त एकच उरते आणि ती म्हणजे हि नळीवरील छिद्रे. या छिद्रांद्वारे हवा जेंव्हा मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल तेंव्हा हवेसोबत चिखलही आत जाईल व परिणामी झिगझॅग अडथळ्यांत हा चिखल अडकून ठिबक चोक –अप होईल.
आता साधारण विचार आहे की – ‘दोन छिद्रे असल्यास कमी घाण आत जाईल व चार छिद्रे असल्यास जास्त. त्यामुळे चार छिद्रे असल्याचा असा काहीही विशेष फायदा नाही उलट नुकसानच आहे. म्हणून शेतकऱ्यांनी दोन छिद्रे असलेली इनलाईन ड्रीप वापरावी हेच सोयीस्कर राहील.’
हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज, जळगाव हि सिंचन क्षेत्रात नावाजलेली कंपनी असून अनेक वर्षे झाले ह्या क्षेत्रात कार्यरत आहे. उत्कृष्ट क्वालिटीचे ठिबक सिंचन व इतर सिंचन साहित्य हि कंपनी तयार करते. ड्रीप संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास आमच्या प्रोडक्ट एक्सपर्टशी तुम्ही खालील नंबर्स द्वारे संपर्क साधू शकता.
1) निलेश पाटील : +91-9284000512
2) नरेश चौधरी : +91-9307300145
ठिबक सिंचन ड्रिपरला किती छिद्रे असावीत? हे व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेण्याकरिता खालील व्हिडीओ नक्की पहा.
-
Product on saleहिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक₹2,500.00 – ₹3,600.00
-
Heera Fertilizer Tank₹4,800.00 – ₹5,000.00
-
हिरा ईझी टू फिट₹3,800.00 – ₹4,500.00
-
हिरा फ्लेक्स पाईप₹3,200.00
-
हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी (10500 चे पॅकेज)₹8,835.00
-
कृषी पाईप₹720.00 – ₹900.00
-
हिरा ऑनलाईन ड्रिप लॅटरल₹1,550.00 – ₹2,400.00
-
हिरा इनलाईन ठिबक₹1,250.00 – ₹1,850.00
-
हिरा नॅनो टाईनी ड्रीप₹750.00 – ₹950.00
Leave a reply