“ बहुउपयोगी हिरा ब्रश कटर / पॉवर विडर / हार्वेस्टर / टिलर ”
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी शेतीवर अवलंबून आहे कारण ६० ते ७० % भारतीय शेती करतात. शेतीव्यवस्था कोलमडली तर त्याचा बराच मोठा परिणाम इतर क्सेत्रांवारही होतो. त्यामुळे शेतीस समृद्ध करण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान व आधुनिक उपकरणे वापरणे हि एक आजच्या काळाची गरज बनली आहे शेतातील तणांचे वेळेत व योग्य पद्धतीने व्यवस्थापन हि एक प्रमुख बाब आहे. वेळच्या वेळी तण नियंत्रण न केल्यास तणांची मुख्य पिकांशी स्पर्धा होऊन उत्पादनात फार मोठी घट होऊ शकते. पारंपारिक पद्धतीनुसार शेतातील तणांचे नियंत्रणासाठी विळ्याचा वापर केला जातो. परंतु सध्या उपलब्ध मनुष्यबळ व वेळेची उपलब्धता, निंदणीचा मजुरी खर्च आणि तणनाशकांची किंमत इत्यादी घटकांचा विचार केल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कमीत कमी मनुष्यबळ व पैशांचा वापर करून तण व्यवस्थापन करणे आवश्यक व गरजेचे झाले आहे.
२१वे शतक हे यंत्रयुग म्हणून ओळखले जाते. सध्याच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतीसाठीही नवनवीन उत्पादने बनवली जात आहेत. ज्यामुळे पूर्वीसारखी घाम गाळणारी व अतिरिक्त वेळ खर्च करावी लागणारी शेती आता बदलतेय. शेतकऱ्याचा शेती करण्याचा अनुभव आनंददायी व सुलभ व्हावा यासाठी महाराष्ट्रातील जळगाव येथील हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजने “ बहुपयोगी हिरा ब्रश कटर ” बाजारात आणले आहे. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव बघता हे यंत्र शेतीतील कंटाळवाण्या व वेळखाऊ कामांसाठी वरदान ठरते आहे. हिरा ब्रश कटर विरळणी, निंदणी , खुरपणी, कोळपणी या आंतरमशागतीच्या कामांसहित पिकांच्या कापणी / चोंदणी साठी हि खूप उपयोगी आहे. हिरा ब्रश कटर हे शेतीव्यवसायाला ‘ हार्ड वर्क ’ कडून ‘ स्मार्ट वर्क ’ कडे घेऊन जात आहे असं काही शेतकरी सांगतात.
हिरा ब्रश कटरचा उपयोग –
या यंत्राचा वापर खालील कामासाठी करता येतो
1) फळबाग व पिकातील गवत काढण्यासाठी
2) चारा पिके ( लसूनघास, बरसीम, धैंचा इ. ) व धान्य ( गहू, भात, ज्वारी, बाजरी, करडई, सोयाबीन इ. ) कापणीसाठी
3) फळबाग छाटणी साठी
4) लॉन ( बागेतील हिरवळ ) कापून समतोल करण्यासाठी
५) पॉलिहाउस व ग्रीनहाउस प्रकारच्या शेतीत याचा अधिक वापर होतो
६) अनावश्यक झुडुपे कापण्यासाठी.
हिरा ब्रश कटरची प्रमुख वैशिष्ठ्ये –
ब्रश कटर हे प्रामुख्याने चारा, धान्य व गहूच्या कापणीसाठी बनवले गेले आहे. या कटरच्या मदतीने साडे-तीन ते चार फुट आकाराचे कोणतेही फळझाड, चारा, झुडूप व गवत सहजपणे कापले जाऊ शकते, जे मऊ व सरळ असतील. ब्रश कटरची वैशिष्ट्ये अशी आहेत की ज्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे आणि यासारखे दुसरे यंत्र बाजारात अस्तित्वातच नाही
१) हिरा ब्रश कटरचे इंजिन आहे २ – स्ट्रोक पेट्रोल इंजिन.
२) हिरा ब्रश कटरचे इंजिन ५२ cc शक्तिशाली इंजिन आहे .
३) हिरा ब्रश कटर अॅल्युमिनिअमपासून बनवले गेल्यामुळे वजनाने अतिशय हलके आहे म्हणूनच वाहून न्यायला सहज सुलभ झाले आहे. हाताळ्णीस सुलभ असे १० – १५ किलो वजन फक्त.
४) हिरा ब्रश कटर यंत्राचा मुख्य भाग पाठीवर घेता येत असल्याने वजन १० – १५ किलो असूनदेखील ते तितके जड वाटत नाही आणि ही ब्रश कटरची आणखी एक खासियत आहे.
५) हिरा ब्रश कटरमध्ये अणकुचीदार दातांचे, टणक धातूचे बनलेले धारदार पाते असल्याने चारही प्रकारच्या गवतांची कापणी परिणामकारकपणे होते.
६) हिरा ब्रश कटर यंत्रात उच्च व प्रगत तंत्रज्ञान वापरले असल्याने ते सुरु करायला सोपे तर आहेच तसेच इंधनात बचत करते आणि शेतीच्या कामातला अमूल्य वेळ वाचवते. पारंपारिक पद्धतीपेक्षा श्रमात ३०% बचत.
७) हिरा ब्रश कटर टूलकीट आणि स्पार्क प्लगसहित उपलब्ध.
८) हिरा ब्रश कटर या यंत्राच्या साह्याने साधारणतः एकरी गवत कापणीसाठी ६ ते ८ तास इतका वेळ लागतो आणि ०.६ ते ०.७ लिटर मात्र इतकेच इंधन लागते. वेळ व आर्थिक नियोजन करण्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकते.
९) हिरा ब्रश कटर मोठे क्षेत्र तसेच लहान भाग तणविरहीत ठेवण्यासाठी, बाग नीटनेटका राखण्यासाठी एक आदर्श पर्याय.
१०) हिरा ब्रश कटरचे हँडल कंप विरोधी आहे तसेच ह्यासोबत मजबूत सुरक्षितता गार्ड आहे.
११) हिरा ब्रश कटर आहे स्पर्धात्मक किंमतीचे आणि उच्च गुणवत्तापूर्ण.
१२) हिरा ब्रश कटर हे उत्कृष्ठ कार्यक्षमता असणारे, अत्यंत टिकाऊ, इंधन व वेळ बचत करणारे आणि बहुउपयोगी असे संयंत्र आहे.
हिरा ब्रश कटर कीट –
१) एक रॉड आणि एक इंजिन असे दोन्ही वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये समाविष्ट केलेले आहेत.
२) यातील टूल कीटमध्ये – अ) वीडर अॅटचमेंट
ब) नायलॉन वायर कटर / ट्रिमर
क) हार्वेस्टर / ग्रास कटर ब्लेड
ड) टिलर
ई) स्पार्क प्लग
फ) गिअर बॉक्स
यासारखी इतर साधनेही अंतर्भूत आहेत.
विशेष म्हणजे बाजारातील इतर ब्रश कटरसारख्या याच्या अॅटेचमेंटस् कमकुवत नाहीत, कारण त्या अवजड धातूंपासून बनलेल्या, विशिष्ठ धारेची पाती असणाऱ्या आणि भारतीय बनावटीच्या आहेत. त्यांच्या ह्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे आयुर्मान अधिक आहे.
अशा तऱ्हेने ब्रश कटर हे शेतीतील अतिशय उपयुक्त अवजार असून २१ व्या शतकातील शेतीसाठी काळाची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ दोन्हीही वाचतात. कामांचा उरक आणि वेग वाढल्यामुळे शेतीकाम सुसह्य व सुबक झाले आहे. यामुळेच अल्पावधीतच ‘हिरा ब्रश कटर’ ने लोकप्रियता मिळवली आहे.
हिरा ब्रश कटरच्या अॅटेचमेंटस् –
TILLER
3-TEETH BLADE
WEEDER
80 – TEETH BLADE
NYLON TRIMMER
ब्रश कटरचा सुरक्षित वापर कसा कराल :-
१) ब्रश कटर वापरण्यापूर्वी त्याचे सर्व पार्टस सुस्थितीत आहेत का हे तपासून घ्यावे. त्यांच्या जोडण्या निर्देशाप्रमाणे झाल्या आहेत ह्याची खात्री करावी. नादुरुस्त, घासलेला किंवा तुटलेला पार्ट दुरुस्त करून घ्यावा किंवा बदलावा. सर्व नट- बोल्ट्स व्यवस्थित कसून घ्यावेत.
२) ब्रश कटर वापरतांना सैल कपडे परिधान करू नयेत. सैल कपडे फिरत्या अॅटेचमेंटस् मध्ये अडकून अपघात होण्याची शक्यता असते. डोळे व तोंड, तसेच पाय ह्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या वस्तू उदा: गॉगल्स, हातमोजे, बूट इ. वापराव्यात.
३) ब्रश कटर सुरु कसे करावे ? :- सुरु करण्यापूर्वी इंधनाची पातळी व्यवस्थित करून घ्या. ब्रश कटर एका समतल ठिकाणी ठेवून एक हात इंजिनवर व दुसरा हात स्टार्ट लिव्हर वर ठेवावा. इंजिनला दोन लॉकिंग सिस्टम्स आहेत त्यासाठी चालू करते वेळेस प्रथम ह्या लॉक्स व्यवस्थित लॉक करण्यासाठी स्टार्ट लिवर दोन वेळेस हळूच ओढावे आणि तिसऱ्या वेळेस थोडे जोरात ओढले कि इंजिन सुरळीत चालू होते. ह्या पद्धतीने ब्रश कटर चालू केल्यास त्याला कधीच स्टार्ट ट्रबल येणार नाही व इंजिनचे आयुष्य वाढेल.
४) इंधन इंजिन चालू स्थितीत असतांना कधीच भरू नये. उष्णतेमुळे आग लागण्याचा किंवा जळण्याचा धोका उद्भवू शकतो. इंधन भरते समयी इंधन सोबत योग्य ग्रेडचे 2T ऑईल 40 ml मिश्रण करावे. या मुळे इंजिनची चालू स्थितीत झीज होणार नाही व आयुष्य वाढेल.
५) काम झाल्यानंतर ब्रश कटरचे सर्व पार्टस व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावेत. काडी – कचरा अडकला असल्यास तो काढून घ्यावा. ब्रश कटर सुस्थितीत सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
६) ब्रश कटरवर काम करणाऱ्या व्यक्तीस ब्रश कटरचे प्राथमिक प्रशिक्षण आवश्य द्यावे म्हणजे अपघात टाळता येईल. ब्रश कटर चालवीत असताना काही अपघात झाल्यास त्वरित मदत पोहचावी ह्या दृष्टीने हाकेच्या अंतरावर एखादी व्यक्ती असल्यास उत्तम. ब्रश कटर चालवीत असतांना चालविणाऱ्या पासून इतरांनी थोड्या दूर अंतरावरच रहावे म्हणजे खाडी उडून किंवा फिरत्या पार्टमध्ये कापड अटकून होणारे अपघात टाळता येतील.
७) प्रथमतः जेंव्हा ब्रश कटर चालवायचे असेल तेंव्हा इंजिन चालू अवस्थेत किमान अर्धा तास आईडल अवस्थेत ठेवल्यास त्याची गती सुरळीत होण्यास मदत होते. तद्नंतर वापरतांना किमान ५ ते १० मिनिटे इंजिन आईडल अवस्थेत ठेवल्यास फायदा होतो.
One comment on “शेतीसाठी वरदान !”
Yogesh Patil
खूप छान माहिती आहे.