भारत देशात ७०% जनता खेड्यात राहते आणि त्यांचा मुख्य व्यवसाय आहे शेती. त्यामुळे भारताला कृषिप्रधान देश म्हटले जाते आणि शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून संबोधण्यात येते. शेती व्यवसाय म्हटले कि एक महत्वाची बाब समोर येते ती म्हणजे शेतीसाठी आवश्यक पाणी बहुतांश शेतकरी विविध सिंचन पद्धतींचा अवलंब करून शेतीची पाण्याची गरज भागवत असतात. सिंचनासाठी आवश्यक पाणी पाण्याच्या स्तोतापासून शेतापर्यंत आणण्यासाठी आणि संपूर्ण शेतात ते विभागून देण्यासाठी पाईपलाईन टाकावी लागते.
पाईपलाईनवरचा खर्च हा सिंचनातील महत्वाचा खर्च आहे कारण तो मोठ्या स्वरूपाचा असतो. अश्यात जर काही कारणांमुळे पाईपलाईन फुटली तर खूप मोठ्या अडचणीचा आणि खर्चाचा शेतकरी बांधवांना सामना करावा लागतो. तर, हि पाईपलाईन फुटून जास्त नुकसान सहन करण्यापेक्षा त्यावर उपाययोजना केलेली बरी !
ह्याचसाठी महाराष्ट्रातील जळगाव येथे स्थित हिरा अॅग्रो इंडस्ट्रीज समस्त शेतकरी बांधवांसाठी यावर उपाय घेऊन आलीय “ प्रेशर रिलीफ व्हाल्व ” – याचा तुमच्या पाईपलाईन जोडणीत वापर करा आणि पाईप फुटण्याच्या संकटातून मुक्त व्हा!
पाईपलाईन फुटण्याची कारणे :
१) पाईपात मोठ्या प्रमाणात घाण अडकणे किंवा एखादा मृत प्राणी अडकणे.
२) चुकून बॉल व्हाल्व बंद असणे.
३) कोणी हेतुपुरस्पर कॉक बंद केल्यास.
४) पाईपलाईनची डिझाईन चुकल्यास.
५) जोडावर किंवा वळणावर प्रेशर जास्त झाल्यास.
६) गरजेपेक्षा जास्त Hp ची मोटार वापरात असल्यास.
कसा कार्य करतो ?
प्रेशर कुकरची शिट्टी जशी काम करते – कुकरच्या आत दाब वाढला कि तो शिट्टी वर होऊन बाहेर टाकला जातो. तशीच यंत्रणा ह्या प्रेशर रिलीफ व्हाल्वची आहे. ह्याला एक इनलेट, एक आउटलेट आणि एक स्प्रिंग तसेच प्रेशर मीटर जोडण्यासाठी एक व्यवस्था दिलेले असते. प्रेशर गरजेपेक्षा जास्त वाढले कि ह्या मधील स्प्रिंग प्रसरण पावून पाणी आउटलेट मधून बाहेर टाकले जाते व प्रेशर नियमित होते.
रचना :
प्रेशर रिलीफ व्हाल्व शेतावर सेट करायची पद्धत
१) व्हाल्व्च्या रॉडवरील नट ढिला करून काढून घ्या
२) व्हाल्वचे कव्हर काढा
३) फॅक्टरी सेट प्रेशरपेक्षा प्रेशर कमीकरायचे असल्यास नट ढिला करा
४) फॅक्टरी सेट प्रेशरपेक्षा प्रेशर जास्त करायचे असल्यास नट टाइट करा
प्रेशर रिलीफ व्हाल्व कुठे लावावा ?
१) मोटर जवळ किंवा हेडर असेम्बलीवर.
२) लांब पाईपलाईन असेल तर १.५ कि.मी वर एक.
३) वळणाच्या व चढ – उताराच्या ठिकाणी.
कसा वापरायचा ?
१) PVC पाईपवर फिटिंग साठी सर्व्हिस सडल वर फिट करावा.
२) HDPE किंवा स्पिंकलर पाईप वर फिटिंग साठी फुट बटम वर लावावा.
३) GI पाईप फिटिंग साठी T चा वापर करून त्यावर फिट करावा.
४) सर्व प्रकारच्या इरिगेशन प्रणाली जिथे पाण्याचा प्रेशरखाली वापर केला जातो जसे कि – रेनगन, रेनपाईप, ५) स्प्रिंकलर, ड्रीप इत्यादी साठी अतिशय उपयुक्त.
Leave a reply