आजकाल बहुतांश शेतकरी सिंचनासाठी ठिबक सिंचन हीच पद्धत वापरतात. परंतु ठिबक संचाचे सामान घेतल्यानंतर त्याला बसविताना काही काळजी घेणे आवश्यक आहे. नाही तर त्यठिकाणी पाण्याचे लिकेज होऊन ठिबक संच फेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठिबक संचात अनेक लहान मोठ्या गोष्टी समाविष्ट असतात जसे कि – रबर ग्रोमेट, टेक ऑफ, जॉइनर, एन्ड कॅप, ड्रिल इत्यादी. हे सामान घेताना आपण घेतलेल्या ठिंबक नळीच्या आकाराचेच ते सामान आहे ह्याची खात्री केली पाहिजे. अन्यथा नुकसान होऊ शकते. शक्यतो ज्या कंपनीची आपण ठिबक घेतली आहे त्याच कंपनीकडून हे सर्व जोडणीचे साहित्य घेतलेले बरे म्हणजे ते तंतोतंत नळीसोबत जुळते.
ठिबक संचाची मुख्य सुरुवात होते सब मेन पाईपलाईन पासून ज्या पाईपवर आपण ठिबकच्या नळ्या जोडतो. ह्यासाठी आपल्याला सब मेन पाईपला ड्रिल च्या सहाय्याने छिद्र पाडावे लागते. आता पाहिले तर ड्रिल हि फार नगण्य गोष्ट आहे पण ती जर आपण नळीच्या साईझच्या आकाराची नाही घेतली म्हणजेच १२ मि.मी नळीसाठी १२ मि.मी ड्रिल / १६ मि.मी नळीसाठी १६ मि.मी ड्रिल आणि २० मि.मी नळीसाठी २० मि.मी ड्रिल हि खात्री करून घेतली पाहिजे. ती व्यवस्थित आहे कि नाही ते तपासून मगच तिचा वापर सब मेन पाईपला छिद्रे पडण्यासाठी केला पाहिजे. ड्रिल हि काही मशिनीद्वारे बनविली जात नाही ती माणसेच बनवितात त्यामुळे त्यांच्या आकारात कमी – जास्त पणा येऊ शकतो पण त्यामुळे मग आपली पुढील जोडणी चुकते तसेच सब मेन पाईपला पाडलेल्या छिद्रा ठिकाणी पाण्याचे लिकेज राहू शकते.
सब मेन पाईपला सरसकट एकदाच सर्व छिद्रे पाडण्याची शेतकऱ्यांची पद्धत आहे. परंतु यात ड्रिल साईझ आणि त्यात पुढे बसविण्याचे साहित्य ह्यांची खात्री न केल्याने शेतकऱ्याची तारांबळ उडू शकते. व्यवस्थित छिद्र न पडल्यास त्यामधून पाण्याचे लिकेज होऊ नये म्हणून वापरावयाचे रबर ग्रोमेट त्या छिद्रात नीट बसणार नाही परिणामी सब मेन वरील छिद्रातून पाण्याचे लिकेज होईल आणि ठिबक संचाची डिझाईन व्यवस्थित बसविता येणार नाही.
त्याकरिता खालीलप्रमाणे काळजी आवश्य घ्या –
१) ड्रिल व्यवस्थित आकाराची घेतली आहे ह्याची खात्री करून घ्या.
२) ड्रिल ची दाते सुस्थितीत आहेत ह्याची सुद्धा खात्री करा.
३) रबर ग्रोमेट योग्य त्याच आकाराचे आले आहेत ह्याची खात्री करा.
४) रबर ग्रोमेट व्यवस्थित बसत नसेल तर लोकल मार्केटमधून ग्रोमेट खरेदी करून लावू नका विनाकारण ते व्यवस्थित फिट न बसल्यास मनस्ताप होईल. ज्या कंपनी कडून ग्रोमेट घेतले आहेत त्यांच्याशी संपर्क करून योग्य आकाराची रबर ग्रोमेट मागवून घेतलेले चांगले.
One comment on “ड्रिप बसवितांना हि काळजी जरूर घ्या ?”
Sunil Hindurao suryawanshi
20mmची टिबक सेट 10500 मधे मिळेल का