ऊस लागवडीमध्ये रेनगनची उपयुक्तता
ऊस एक तृणवर्गीय वनस्पती आहे. मुख्यत्वे, गुळ, साखरेसाठी पिकवण्यात येते. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागाला ‘ शुगरबेल्ट ’ असे संबोधण्यात येते. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मिरज इत्यादी भागात उसाचे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे तिथे सहकारी व खासगी तत्वावर चालणारे साखर कारखाने सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.
ऊस हे पिक ऊंच वाढत असते. ऊसाची पाने हि आकाराने अरुंद व लांब असतात.ऊंच वाढलेल्या ऊसाच्या पानांवर धूळ साचून त्यांची अन्न निर्मितीची प्रक्रिया खुंटू शकते. ह्याचा परिणाम एकंदरीत उत्पन्न आणि ऊसाचा दर्जा ह्यांच्यावर होऊ शकतो. रेनगन हि पिकांवर पावसासारखे पाणी फवारू शकते. त्यामुळे रेनगनचा वापर केल्यास आपण ऊसावर उंचीवरून पाणी फवारू शकतो. त्यामुळे पिकांची पाने धुतली जाऊन ऊसामध्ये प्रकाश संश्लेषणाचा ( अन्न निर्मिती प्रक्रिया ) वेग वाढेल. शिवाय उसावरील कीड व रोग हि धुतले जातील आणि पिक निरोगी राखण्यास मदत होईल.
रेनगन
१) आपल्या नावाप्रमाणेच रेनगन पिकांवर पावसासारखे पाणी फवारते.
२) रेनगन हि अॅल्युमिनिअम आणि उच्च दर्जाच्या प्लास्टिक ची बनलेली असल्याने मजबूत आणि टिकाऊ असते.
३) रेनगन ला आपण 0० ते 360०गोलाकार फिरवू शकतो.
४) रेनगन ला विशिष्ट जेट ब्रेकर व्यवस्था दिलेली असल्याने पाण्याचे प्रेशर विभागून पाणी फवारले जाते.त्यामुळे पिकांना कुठलेही नुकसान पोहचत नाही. म्हणजेच पिके झोडपली जात नाहीत.
५) रेनगन सोबत पाण्याच्या फवाऱ्याची तीव्रता कमी जास्त करण्यासाठी तीन नोझल दिलेले असतात.
६) रेनगन हा आधुनिक तुषार सिंचनाचा एक प्रकार आहे.
७) पाण्याच्या 4kg प्रेशरवर 170 फुट (26 मीटर) गोलाकार पर्यंत पाणी फवारणी करू शकते.
८) दर मिनिटाला 211 लिटर पाणी फवारण्याची क्षमता.
९) रेनगन मध्ये दोन ठिकाणा वरून पाणी बाहेर पडते (1.दूरचे क्षेत्र, 2.जवळचे क्षेत्र) ज्यामुळे कोरडे क्षेत्र राहत नाही.
Leave a reply