पंप चालू स्थितीमध्ये असताना त्यातून योग्य प्रवाह किंवा योग्य दाबाचे पाणी मिळत नसल्यास काही बिघाड आहे असे आढळून येते. अशावेळी त्याची कारणे शोधून त्यावर मात करावी. नेहमी आढळणारे पंपातील बिघाड व त्यांची कारणे खाली दिली आहेत.
बिघाड (अ) : पंपातून पाणी उत्सर्जित होत नसल्यास
कारणे : 1) पंपातील शोषण नळी पूर्णपणे भरलेली नसणे.
2) पंपाच्या फेऱ्यांची गती अत्यंत कमी होणे
3)पंपातून पाणी उत्सर्जित करण्याची उंची जास्त असणे.
4) शोषण नळीची उंची जास्त असणे.
5) पंपाचा पंखा किंवा शोषण नळी पूर्णपणे तुंबलेली असणे.
6) पंपाच्या फेऱ्यांची दिशा विरुद्ध असणे.
7) शोषण नळी किंवा स्टफिंग बॉक्समध्ये गळती असणे.
8) पंपाची पाणी खेचण्याची क्षमता कमी असणे.
बिघाड (ब) : पुरेसे पाणी उत्सर्जित होत नसल्यास
कारणे : 1) शोषण नळी किंवा स्टफिंग बॉक्समध्ये गळती असणे.
2) पंपाच्या फेऱ्यांची गती आवश्यकतेपेक्षा कमी असणे.
3) ठरविलेल्या दाब उंचीपेक्षा उत्सर्जनाची दाब उंची कमी असणे.
4) शोषण नळीची उंची जास्त असणे.
5) पंपाचा पंखा किंवा शोषण नळी अंशत: तुंबलेली असणे.
6) पंख्याची क्षमता कमी असणे.
7) फुटव्हॉल्व आवश्यकतेपेक्षा आकाराने कमी असणे.
8) शोषण नळी पाण्यात आवश्यकतेपेक्षा कमी बुडलेली असणे.
9) बिअरिंग झिजलेली असणे.
बिघाड (क) : पंपाकडून पुरेसा दाब निर्माण होत नाही.
कारणे : 1) पंपाच्या पंख्याच्या आकार (व्यास) कमी असणे.
2) पंपाच्या फेऱ्यांची गती कमी असणे
3) शोषण नळीत किंवा कोषात हवा असणे.
4) पंपाच्या फेऱ्यांची दिशा विरुद्ध असणे.
5) फवारणी करण्याचे द्रव्य पदार्थाची घनता जास्त असणे.
6) बिअरिंग झिजलेली असणे.
बिघाड (ड) : पंप थोडा वेळ चालून पाणी उपसा बंद पडणे.
कारणे : 1) शोषण नळी किंवा स्टफिंग बॉक्समध्ये हवेची गळती होणे.
2) उपसा करावयाच्या द्रवात भरपूर वायू व हवा असणे.
3) शोषण नळीत हवेचा बुडबुडा असणे.
4) पाणी बंद करणारी नळी (वॉटर सील ट्यूब) तुंबणे.
5) शोषण नळीची उंची प्रमाणापेक्षा जास्त असणे.
6) शोषण नळी पाण्यात आवश्यकतेपेक्षा कमी बुडलेली असणे.
बिघाड (इ) : पंपास आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा (शक्ती) लागणे.
कारणे : 1) पंपाच्या फेऱ्यांची गती जास्त असणे.
2) आवश्यकतेपेक्षा शोषण नळी कमी लांबीची असणे व त्यामुळे पाण्याचा
भरपूर उपसा होणे.
3) पाण्याची किंवा उपसा करावयाच्या द्रवाची घनता किंवा ‘विशीष्ट गुरुत्व’ प्रमाणापेक्षा जास्त असणे.
4) पंपाच्या फेऱ्यांची दिशा विरुद्ध असणे.
5) स्टफिंग बॉक्स फार घट्ट असणे.
6) फिरणारे पदार्थ फार घासले जाणे.
7) आस-दांडा (शाफ्ट) सरळ नसणे.
8) बिअरिंग झिजलेले असणे.
बिघाड (फ) : स्टफिंग बॉक्समध्ये गळती असणे.
कारणे : 1) ग्लॅन्ड पॅकिंग झिजणे किंवा सदोष वंगण व्यवस्था
2) ग्लॅन्ड पॅकिंग सदोष बसविलेले असणे.
3) पॅकिंग सदोष असणे.
4) आसदांड्याच्या बाहीवर रेघा पडलेल्या असणे.
5) आसदांडा सरळ नसणे.
बिघाड (ग) : पंपातून आवाज येणे किंवा पंप थरथरणे
कारणे : 1) शोषण नळीची लांबी जास्त असणे.
2) पंपाची क्षमता कमी असणे.
3) शोषण नळी किंवा पंखा अंशत: तुंबलेला असणे.
4) पंप आणि मोटर/ इंजिन सरळ रेषेत नसणे.
5) चौथरा (फौंडेशन) डळमळीत असणे.
6) वंगणाचा अभाव असणे.
7) बिअरिंगझिजलेल्या असणे.
8) पंपाच्या फिरणाऱ्या भागांचा तोल गेल्यामुळे आसदांडा वाकडा असणे.
-
Product on saleहिरा गोल्ड कृषी पाईप ब्लॅक₹2,500.00 – ₹3,600.00
-
Heera Fertilizer Tank₹4,800.00 – ₹5,000.00
-
हिरा ईझी टू फिट₹3,800.00 – ₹4,500.00
-
हिरा फ्लेक्स पाईप₹3,200.00
-
हिरा फ्लॅट इनलाइन ड्रिप पॅकेज 1 एकरसाठी (10500 चे पॅकेज)₹8,835.00
-
सेमी ऑटोमेटीक डिस्क फिल्टर₹4,500.00 – ₹6,100.00
-
Product on saleहिरा डिस्क फिल्टर₹3,300.00 – ₹4,700.00
-
कृषी पाईप₹720.00 – ₹900.00
-
Product on saleप्लास्टिक स्क्रीन फिल्टर₹2,000.00 – ₹3,000.00
Leave a reply